Sericulture Success Story: ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असताना नांदेड जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी कमी पाण्यातही भरघोस उत्पादनाचा आदर्श घालून दिला आहे. त्यात लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील प्रगतिशील शेतकरी दाजीराव शिंदे यांनी तुती लागवडीवर आधारित रेशीम शेतीतून वर्षातील पहिल्याच बॅचमध्ये दीड एकरात २३७ किलो दर्जेदार कोष उत्पादन घेत १ लाख ९३ हजार ३५९ रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे..यंदा कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात खरीप पेरण्या उशिरा झाल्या असून, अनेक भागांत दुबार पेरणीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत जोमेगाव परिसरातील सुमारे २५ ते ३० शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारून उत्पादनात सातत्य राखले आहे..Sericulture Centre Fund Issue: निधीअभावी चिकलठाणा रेशीम केंद्राची रखडपट्टी.मागील वर्षी सर्वाधिक कोष उत्पादनाचा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळविलेल्या शिंदे यांनी यंदा २२५ अंडीपुंजांचे संगोपन केले. संगोपनाच्या काळात तापमान वाढल्याने त्यांनी रेशीमगृहाला जूटच्या पोत्यांचे आवरण घालून त्यावर पाण्याचा शिडकावा केला. त्यामुळे रेशीमगृहातील तापमान सुमारे १० अंशांनी कमी करण्यात यश आले. ठिबक सिंचनाद्वारे कमी पाण्यात तुतीची जोपासना करत अळींचे संगोपनही यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले..शुक्रवारी (ता. २४) बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या त्यांच्या कोषाला दिवसातील सर्वाधिक ८१५ रुपये प्रति किलो दर मिळाला. परिणामी, २३७ किलो कोषापासून १ लाख ९३ हजार ३५९ रुपयांचे उत्पन्न मिळाले..Sericulture Farming: बदलत्या हवामानात रेशीम उद्योग हा शेतकऱ्यांसाठी उत्तम पर्याय : विजयअण्णा बोराडे.जोमेगाव येथील अविनाश शिंदे यांच्या १२४ किलो कोषाला ८१० रुपये प्रति किलो, तर मारुती शिंदे यांच्या ५६ किलो कोषाला ७९५ रुपये प्रति किलो दर मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे..Sericulture Success Story: पाणलोटामुळे रेशीम शेतीला चालना.‘एल निनो’मुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीत इतर पिकांच्या तुलनेत सुमारे ६० टक्के कमी पाण्यात तुतीची लागवड यशस्वीपणे करता येते. रेशीम शेतीतून वर्षातून पाच ते सहा वेळा नियमित रोख उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या शेतीकडे वळावे.राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, नांदेड.कमी पर्जन्यमानामुळे खरिपातील पारंपरिक पिके धोक्यात असताना रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करून प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक एकर क्षेत्रावर तुती लागवडीचा विचार करावा.अशोक वडवळे, रेशीम विकास अधिकारी, नांदेड.यंदा आमच्या भागात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन आणि कापसातून खर्च निघेल की नाही, याची चिंता होती. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून तुतीची जोपासना केली. पहिल्याच बॅचमध्ये जवळपास दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला.दाजीराव शिंदे, रेशीम उत्पादक, जोमेगाव, ता. लोहा, जि. नांदेड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.