Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातअजूनही ऊस तोडी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या नाहीत. मंत्री समितीच्या निर्णयानुसार अधिकृत ऊस गळीत हंगाम शनिवार (ता. १) पासून सुरू होणार आहे. अनेक कारखान्यांनी ३४०० ते ३४५० रुपयांपर्यंत दर जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या विविध शेतकरी संघटनांकडून आंदोलन सुरू आहे. ३७५० ते ४००० रुपयांच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. ३१) अनेक ठिकाणी ऊसतोडणी रोखण्याचे प्रयत्न सुरू होते..गुरुवारी (ता. ३०) कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर कोपार्डे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रात्री आठ वाजता आंदोलन करत दालमिया व डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे ऊस वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर रोखून धरले. या वेळी काही प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. दालमिया कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन ऊसतोडी थांबवितो व दर जाहीर करू, असे आश्वासन दिल्यानंतर ट्रॅक्टर सोडण्यात आले..Sugarcane Price Protest: कोल्हापूर ऊसपट्ट्यात मोठ्या आंदोलनाची तयारी, ऊसदरावरून राजू शेट्टींची शेतकऱ्यांना हाक.या वेळी बाजीराव देवाळकर म्हणाले, की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांनी ३७५१ रुपये एक रकमी एफआरपी जाहीर केल्यानंतरच ऊसतोडी सुरू कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत. दालमिया साखर कारखान्याने ऊसतोडी सुरू केल्याने त्यांचे पाच ट्रॅक्टर येथे अडवून धरण्यात आले. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचीही ऊस वाहतूक रोखून धरण्यात आली. शुक्रवारी शिरोळ परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ऊस तोडी बंद पाडल्या. हंगाम सुरू होत असला तरी अजूनही प्रशासनाने तातडीने बैठक घेण्याबाबत कोणत्याही हालचाली सुरू केल्या नसल्याचे चित्र होते..Sugarcane Worker Support: ऊसतोड कामगारांना तात्काळ आर्थिक मदत द्या: उपसभापती गोऱ्हेंची मागणी .अहिल्यानगरला बैठकीत तिढा कायमऊस गाळप हंगाम सुरू झाला असताना बहुतांश कारखान्यांनी दर जाहीर केले नाहीत. दर जाहीर कधी करणार, ऊसाचा काटा मारण्याचा प्रकार कधी थांबणार? शेतकऱ्यांच्या उसाच्या दरातून कर्जवसुली थांबवणार का? कायद्यानुसार ऊस घातल्यानंतर चौदा दिवसांत पैसे देणार का? ज्या कारखान्यांनी पैसे थकवले त्यांच्याकडून व्याजासह वसुली करणार का? अशा अनेक प्रश्नांचा शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी भडिमार केला. यातील बहुतांश प्रश्नांवर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे अधिकारी निरुत्तर झाले. अखेर अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हंगे यांनी प्रश्न समजून घेत तोडगा काढणार असल्याचे स्पष्ट केले..ऊसदर ३५५१ रुपये प्रति टन दर जाहीर न केल्यास ऊसतोड होऊ न देण्याचा इशारा संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांनी दिला. अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदर व अन्य प्रश्नांबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या पुढाकाराने बैठक झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातील अधिकारी, शेतकरी संघटना आणि जिल्हाभरातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते..स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रावसाहेब लवांडे, बाळासाहेब फटांगडे, रमेश कचरे, आरले, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बैठकीत प्रश्न उपस्थित केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.