Agriculture Management: शेतकरी नियोजन । पीक : काकडीशेतकरी : प्रशांत गोरोबा भोसलेगाव : पडसाळी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूरएकूण शेतीः ८ एकरएकूण शेतीः २ एकर.पडसाळी (ता.उत्तर सोलापूर) येथील प्रशांत गोरोबा भोसले यांची आठ एकर जमीन आहे. त्यांनी द्राक्ष, कलिंगड, काकडी या पिकांची लागवड केली आहे. त्याचबरोबर लेट खरीप किंवा रब्बीमध्ये वातावरण पाहून दरवर्षी कांदा लागवडीचे नियोजन करतात. यंदाही त्यांनी कांद्याची लागवड केली आहे. या पिकांसह भाजीपाला-फळभाज्या लागवडीकडे त्यांचा कल असतो. कांद्यासह भाजीपाला पिकामध्येही गुणवत्ता, दर्जा आणि उत्पादनामध्ये त्यांची कायमच आघाडी राहिली आहे. .यावर्षी त्यांनी २ एकरांत काकडीची लागवड केली आहे. तसेच कांद्याचे ४ एकर, दोन एकर कलिंगडाची लागवड केली आहे. सर्वच पिकांच्या उत्पादनासाठी सेंद्रिय आणि रासायनिक या दोन्ही पद्धतीने समतोल साधण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण शेतामध्ये राबतात. जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये त्यांनी चार एकरावर ढोबळी मिरचीची लागवड केली होती. .Cucumber Farming : वाळकीच्या शेतकऱ्यांना मिळतेय काकडीचे सुधारित लागवड तंत्र .मात्र पावसामुळे अपेक्षित उत्पादन हाती आले नाही. त्यामुळे मिरचीच्या तयार बेडवरच त्यांनी दोन एकरावर कलिंगड आणि दोन एकर क्षेत्रावर काकडीची लागवड केली आहे. सध्या काकडीची वाढ जोमदार झाली असून योग्य नियोजनामुळे पिकाची स्थिती उत्तम आहे. थंडीच्या काळामध्ये काकडीची वाढ योग्यप्रकारे होत नाही. .अशा स्थितीमध्येही योग्य व्यवस्थापनातून सध्या पिकाची स्थिती उत्तम राखण्यात त्यांना यश मिळाले आहे. सध्या पुणे येथील बाजारपेठेमध्ये काकडीस दरही चांगले आहेत. मिरची पीक हातून गेल्यामुळे काकडी पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्थापनातून गुणवत्तापूर्ण उत्पादकता साधण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशांत भोसले सांगतात..लागवड नियोजन मिरचीसाठी तयार केलेल्या बेडवर दोन एकरांत काकडीच्या सुधारित वाणाची लागवड केली आहे. लागवडीसाठी एकरी ७ हजार रोपांची आवश्यकता भासली. दोन एकरांत लागवडीसाठी १४ हजार रोपांची गरज भासली. साधारण १० ऑक्टोबरच्या लागवड ६ बाय १.२५ फूट अंतरावर केली आहे. लागवडीसाठी रोपे घरीच तयार करण्यात आली. जेणेकरून उत्पादन खर्च नियंत्रित राखला जाईल..Cucumber Farming : खरीप काकडीचे अधिक उत्पादन शक्य.लागवड केल्यानंतर १० दिवसांनी ह्युमिक ॲसिड आणि १९ः१९ः१९ ड्रीपद्वारे देण्यात आली. त्यानंतर ५ दिवसांनी जीवामृत सोडले. लागवडीनंतर २० व्या दिवशी १२ः६१ः० आणि मॅग्नेशिअम सल्फेट खताची मात्रा ठिबकद्वारे देण्यात आली.त्यानंतर २५ व्या दिवशी कॅल्शिअम नायट्रेट आणि बोरॅान खताची प्रति एकरी मात्रा दिली. तिसाव्या दिवशी २४ः२४ः० आणि ३५ व्या दिवशी १२ः६१ः० खताची प्रति एकरी मात्रा दिली. त्याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्ये दिली. सर्व मात्रा ठिबकद्वारे दिल्या..प्रतिबंधात्मक उपायांवर भरकाकडी पिकामध्ये विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यात प्रामुख्याने फुलकिडे, अळी, नागअळीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी पिकाचे नियमित निरिक्षण करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दर पंधरवड्यातून रासायनिक कीटकनाशकांची आलटून-पालटून फवारणी करण्यात आली..आगामी नियोजन सिंचनाचे काटेकोर नियोजन करण्यात आले. सिंचन नियोजनामध्ये पहिल्या पंधरवड्यात दररोज २० ते २५ मिनिटे ठिबकद्वारे सिंचन करण्यात आले. त्यानंतरच्या पंधरवड्यात रोज १ तास सिंचन करण्यात आले. पुढील पंधरवड्यात दीड तास सिंचन केले जाईल. सिंचन करताना पिकाची पाण्याची गरज आणि वाफसा स्थिती पाहून सिंचनाचा कालावधी ठरविला जाईल. पुढील १० दिवसांत पीक काढणीस येईल. हा प्लॉट पुढील साधारण दीड महिना सुरू राहील. सुरुवातीच्या तोड्यांमध्ये उत्पादन कमी येईल. त्यानंतर हळूहळू उत्पादनात वाढ मिळत जाईल. एकदिवसाआड असे आठवड्यात तीन तोडे घेतले जातील. उत्पादित काकडीची विक्री सोलापूर मार्केटसह पुण्यातील बाजारपेठेत केली जाईल.. तोडे सुरु झाल्यानंतर पहिल्या पंधरवड्यात फुटवा येण्यासाठी शिफारशीत अन्नद्रव्यांचा ठिबकद्वारे वापर केला जाईल. तसेच फुलकळी सेटिंग होण्यासाठी देखील ठिबकद्वारे मात्रा दिली जाईल. आगामी काळात सिंचनाचे काटेकोर नियोजन करून सिंचन केले जाईल. आवश्यकतेनुसार २ तासांपर्यंत ठिबकचा कालावधी वाढविला जाईल. प्रशांत भोसले, ९५८८४१२०३७(शब्दांकन : सुदर्शन सुतार).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.