Chhatrapati Sambhajinagar News : वाळूज आणि चिकलठाणा या औद्योगिक क्षेत्रासह डीएमआयसी आणि ऑरिक सिटीत विविध उत्पादने तयार होतात. या उत्पादनामध्ये वाढ करून जिल्ह्याची निर्यातक्षमता वाढविण्यासाठी सर्व उद्योग समूहांनी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय (Collector Astik Kumar Pandey) यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय निर्यात धोरण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार प्रशांत बंब, पोलिस उपायुक्त अर्पणा गिते, निवासी उपजिल्हाधिकारी जर्नादन विधाते, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मंगेश केदार, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, विजय चव्हाण, सतीश सोनी, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, ‘मसिआ’चे अध्यक्ष अनिल पाटील विविध उद्योगाचे आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी या समितीच्या बैठकीत उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, की औद्योगिक विकासासाठी रस्ते, वीज, पाणीपुरवठा त्याचप्रमाणे कचऱ्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी कार्यवाही करावी.
एमआयडीसीमध्ये माथाडी कामगारांना सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी.
लगतच्या ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या विविध समस्यांविषयी उद्योग विभाग, महसूल आणि बांधकाम विभागाच्या सदस्यांची समिती स्थापन करून उद्योजकता परवाने व जमीन उपलब्ध करून देण्याबाबत समिती स्थापन करावी. एमआयडीसी क्षेत्राबाहेरील घटकांना अकृषिक परवाने, सातबाराच्या नोंदी, जमीन हस्तांतर नसल्याने सवलती मिळण्यास अडचणी येतात.
यावर समितीने उपाययोजना सुचवाव्यात व पुढील बैठकीत सादर कराव्या. शेंद्रा ते वाळूज महामार्गावर उड्डाण पूल, वाळूज एमआयडीसी बस स्टॅण्ड मुख्य रस्त्यापासून १०० मीटर अंतरावर स्थलांतरित करण्यात यावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.