Solapur News: केंद्राच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (पीएमव्हीबीआरवाय) आणि कर्मचारी नोंदणी अभियान (ईईसी २०२५) या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी येथील ईपीएफओ सोलापूर प्रादेशिक कार्यालयाकडून विशेष मोहीम सुरू आहे..विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत देशभरात रोजगारनिर्मितीसाठी ९९ हजार ४४६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ३.५ कोटी नव्या नोकऱ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पहिल्यांदा नोकरी मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपयापर्यंतचे प्रोत्साहन, तर नव्या रोजगारनिर्मितीसाठी नियोक्त्यांना प्रति कर्मचारी दरमहा ३ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे..PM Viksit Bharat Employment Scheme: विकसित भारत रोजगार योजना फसवी घोषणा : गांधी.कर्मचारी नोंदणी अभियानात अद्याप ईपीएफओत नोंदणी न झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षेच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू आहे. या अभियानात जुन्या पीएफ योगदानावर सवलत, केवळ १०० रुपये इतकी नाममात्र दंडात्मक रक्कम अशा सुलभ तरतुदी करण्यात आल्या आहेत..Viksit Bharat Scheme: तरुणांना १५ रुपये बोनस देणार; १ लाख कोटींची विकासित भारत योजना आजपासून सुरु.येथील प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त पुरुषोत्तम मीना यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू आहे. यामध्ये औद्योगिक आस्थापनांना भेटी, कार्यशाळा, वेबिनार आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत..त्यासाठी ईपीएफओ सोलापूर प्रादेशिक कार्यालयात स्वतंत्र हेल्पडेस्क सुरू करण्यात आला आहे. मार्गदर्शनासाठी साधू शकतात, असे आवाहन करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.