Kolhapur News: ‘‘तरुणांनी ग्रामीण भागामध्ये कृषी प्रक्रिया उद्योग उभारावेत. यातून आर्थिक विकास साधता येऊ शकतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार वाढविण्यास मदत होईल,’’ असे मद जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी व्यक्त केले. .येथील आजरा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी यांच्या वतीने अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत एकदिवसीय कार्यशाळा दोन सत्रांत पार पडली. .Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगाच्या संगोपन केंद्रासाठी अनुदान बंद.‘कृषी प्रक्रिया उद्योग संधी व आव्हाने’ हा विषय मांडण्यात आला. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी अध्यक्षस्थानी होते..Agriculture Processing Industry : कृषी प्रक्रिया उद्योगांच्या ‘एक खिडकी’साठी प्रयत्नशील.पहिल्या सत्रात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लजचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. के. आर. तनंगे तर दुसऱ्या सत्रात र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगडचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एस. सावंत यांनी मार्गदर्शन केले..आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांतील १२ महाविद्यालयांतील विद्यार्थी व शिक्षक कार्यशाळेत सहभागी झाले. प्राचार्य प्रा. डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. समन्वयक डॉ. एम. आर. ठोंबरे यांनी स्वागत केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.