Livestock Grazing: खानदेशात २०२५ मध्ये चांगला पाऊस झाला असला तरी मेंढपाळ बांधवांची भटकंती यंदा डिसेंबरपासूनच सुरू झाली आहे. सध्या पूर्व खानदेशातील विविध भागांत या मेंढपाळांचे मुक्काम सुरू असून, शिवारात मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांची चराई सुरू आहे..खानदेशात धुळे, नंदुरबार भागातील मेंढपाळ दरवर्षी येतात. यंदा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि लगतच्या भागातील मेंढपाळही मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. कोरडवाहू क्षेत्रातील पिके लवकर संपल्याने आणि पऱ्हाटीचे क्षेत्र लवकर मोकळे झाल्याने डिसेंबरपासूनच चराई सुरू झाल्याचे दिसून येत आहे..Shepherds Migration: मेंढपाळांचा मुक्काम पूर्व खानदेशातील तालुक्यांत कायम .साधारणतः मार्च ते एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यातील जामनेर, रावेर, यावल, चोपडा, जळगाव, भडगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर भागात मेंढपाळ दाखल होतात. मात्र यंदा ही मंडळी सुमारे दोन महिने आधीच आली आहे..शेतकरी आपल्या रिकाम्या शेतात मेंढपाळांना मेंढ्यांसह मुक्कामासाठी जागा उपलब्ध करून देतात. साधारण दोन ते पाच दिवस एका शेतकऱ्याकडे मुक्काम असतो. त्याबदल्यात मेंढपाळांना दररोज पाच ते सात हजार रुपयांपर्यंत मोबदला मिळतो..Shepherds Migration : पूर्व खानदेशात मेंढपाळ बांधव दाखल .ग्रामपंचायतींकडून चराईसाठी निधीस्थानिक ग्रामपंचायतीही मेंढपाळांना चराई व पाण्यासाठी मोकळीक देताना निधी घेतात. शिवाराचे क्षेत्र जितके मोठे, तितका अधिक मोबदला ग्रामपंचायतींना द्यावा लागतो. साधारण ४०० ते ५०० हेक्टर क्षेत्रासाठी मेंढपाळांकडून ५० ते ६० हजार रुपये घेतले जातात. दोन ते अडीच महिने ही मंडळी विविध शेतांत मुक्कामी राहते. मेंढ्यांचे मलमूत्र शेतीसाठी उपयुक्त मानले जात असल्याने शेतकरीही या मंडळींना शेतात मुक्काम देण्यास प्राधान्य देतात. एका शिवारात चार ते पाच मेंढपाळ कुटुंबे मेंढ्या व संसारासह दाखल होत आहेत..पावसाळा सुरू होईपर्यंत मुक्कामपावसाळा सुरू होईपर्यंत, म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मेंढपाळांची भटकंती सुरू राहते. पाऊस सुरू झाल्यानंतर त्यांचे मुक्काम नदीकाठ, शासकीय जागा किंवा गावठाण भागात हलविले जातात. आपल्या मूळ भागात चांगला पाऊस झाल्यानंतर ही मंडळी पुन्हा गावी परततात. सध्या खानदेशात धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि येवला भागातील मेंढपाळ मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.