Ahilyanagar News: सद्यःस्थितीत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस तापमान आहे. यंदा उष्णता लवकरच जाणवत असल्याने नागरिकांकडून उन्हाळ्याचा दृष्टीने आवश्यक काळजी, आवश्यक खरेदीला सुरुवात केली आहे. .यामध्ये प्राथमिक खरेदी म्हणजे मातीचे माठ. उष्णतेच्या दिवसात फ्रीज अथवा इतर उपकरणांनी थंड झालेल्या पाण्यापेक्षा मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याला नागरिकांची पसंती सर्वाधिक आहे. त्याचदृष्टीने शहरात मातीची मडकी विक्रीस सुरुवात झाली आहे..Summer Heat : तळपत्या उन्हात फ्रिज मधील पाण्यापेक्षा माठातील पाण्याची चव काही औरच.फेब्रुवारीच्या मध्यापासून प्रखर उष्णता जाणवत आहे. रात्री, पहाटेची थंडी कमी होत उष्णतेच्या झळा सुरू झाल्या आहेत. भर उन्हाळ्यात फ्रीज अथवा इतर इलेक्ट्रिक उपकरणांपेक्षा पारंपरिक मातीच्या माठातून थंडगार पाणी पिण्यासाठी मिळावे, म्हणून बाजारात मातीची मडकी विक्रीला आले आहेत. .Clay Pot Water : फ्रिजऐवजी प्या माठातील थंडगार पाणी ; मिळतात इतके फायदे .पूर्वी काळ्या आणि लाल रंगाचे माठच बाजारात मिळत होते. आता काळानुरूप बदल होत असून, रंगीबेरंगी आणि नळाच्या तोट्या लावलेले माठ बाजारात विक्रीला आले आहेत..२५० ते ७०० रुपयांपर्यंत माठ१५० ते २०० रुपयांना असणारे माठ उन्हाळ्याच्या दिवसात २५० पासून ५०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. यात मोठ्या प्रमाणात काळ्या माठाची विक्री होत असून, नळ असलेल्या माठांची किंमत थोडी जास्त म्हणजेच ७०० ते एक हजार रुपये आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.