Early Watermelon Farming: जळगाव- खानदेशात आगाप कलिंगडाची लागवड पुढील पंधरवड्यात सुरू होणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी पुढील महिन्याच्या मध्यात लागवड करण्याचे नियोजन केले आहे. यंदा नंदुरबारात लागवड कमी होणार असल्याची माहिती असून, खानदेशातील एकूण क्षेत्र तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर राहण्याची शक्यता आहे..यंदा पाऊसमान कमी राहिल्याने कलिंगड लागवडीस कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. खानदेशात रब्बी हंगामात कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. ही लागवड दसरा सणापासून सुरू होते. मात्र, सध्या आगाप लागवड करण्याचे जामनेरसह चोपडा आणि धुळ्यातील शहादा भागातील शेतकरी टाळत आहेत..Watermelon Cultivation: खानदेशात कलिंगड लागवड घटली.जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुका कलिंगड लागवडीत आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ चोपडा, यावल, मुक्ताईनगर भागात कलिंगडाची लागवड केली जाते. कलिंगड पिकाला अखेरच्या १५ ते २० दिवसांत अधिक पाण्याची गरज असते. या काळात दररोज पाच ते सहा तास सिंचन करावे लागते..Watermelon Farming : कलिंगडास प्रतिकूल वातावरणाचा फटका.चोपडा तालुका अग्रेसरचोपडा, यावल भागात कलिंगडाची लागवड वाढू लागली आहे. जामनेरमधील लागवडही स्थिर राहणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील क्षेत्रात मोठी घट किंवा वाढ होणार नाही. धुळे जिल्ह्यात धुळे आणि शिरपूर भागातील काही शेतकरी कलिंगडाची लागवड करतात.धुळ्यातही क्षेत्रात मोठी घट किंवा वाढ होणार नाही. जळगाव व धुळे जिल्ह्यांत मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरवर कलिंगडाचे पीक राहण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी कलिंगड बियाणे खरेदी करून रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करून घेण्याचे नियोजन केले आहे. .एका रोपासाठी ७० पैसे खर्च अपेक्षित आहे. तर अनेकांनी दोन रुपये प्रतिरोप या दराने रोपवाटिकांतून रोपे खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. नंदुरबारात मागील हंगामात सुमारे अडीच हजार हेक्टरवर कलिंगडाची लागवड झाली होती. मात्र, यंदा तेथील लागवड कमी होणार आहे. खानदेशातील एकूण क्षेत्र मागील हंगामात सुमारे नऊ हजार हेक्टर होते. यंदा हे क्षेत्र तीन ते साडेतीन हजार हेक्टरवरच राहण्याची शक्यता आहे..नुकसानीची समस्यामागील हंगामात सप्टेंबर व डिसेंबरमध्ये विषम वातावरणासह विविध रोगांमुळे कलिंगडाचे नुकसान झाले होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी ६० ते ७० हजार रुपये खर्च केला होता. मात्र, अनेकांचा हा खर्चही वाया गेला होता.कलिंगडाचे पीक नाजूक आणि अधिक श्रमाचे आहे. त्यात दररोज विद्राव्य खतांचा वापर करावा लागतो, तसेच आवश्यकतेनुसार एक दिवसाआड फवारणी करावी लागते. त्यामुळे मोठे बागायतदार शेतकरी कलिंगड पिकापासून दूर राहण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.