Papaya Flowering Stage: उष्णतेतही काटेकोर नियोजन करून अनेकांनी पपई पीक वाढविले आहे. यात आगाप लागवडीच्या पिकात फुलधारणा सुरू आहे. पपईची लागवड खानदेशात स्थिर आहे. नंदुरबार जिल्हा पपई लागवडीत आघाडीवर आहे. जिल्ह्यात मागील हंगामात सुमारे सात हजार हेक्टरवर पपई पीक होते. .नंदुरबारातील एकट्या शहादा तालुक्यात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर पपई पिकाची लागवड झाली होती. परंतु मागील हंगामात पपईला अल्प दर मिळाला. फक्त ऑक्टोबर व नोव्हेंबर २०२५ च्या मध्यापर्यंत दर टिकून होते. सुरवातीला पपई दर १८ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते. जशी आवक वाढली तसे पपई दर कोसळले. डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीत पपईला सरासरी तीन रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला..Pigeon Pea Farming: खानदेश भागात तूर पिकात शेंगा होताहेत पक्व .मार्चमध्ये दुसऱ्या आठवड्यात पपई दरात सुधारणा झाली. परंतु मार्च महिन्यापर्यंत अनेकांनी पीक काढून क्षेत्र रिकामे केले. कारण काढणी ठप्प होती. खरेदीदार पपई घेण्यास येत नव्हते. शेतातच किंवा झाडावर पपई पक्व होऊन खराब होण्याचा प्रकारही वाढला होता. शिवाय नंदुरबार, धुळे जिल्ह्यात रोगराईमुळे पपई पिकाची हानी झाली. यामुळे पपई लागवड २०२६ मध्ये घटेल, असे संकेत होते. पपईची लागवड खानदेशात मार्च ते मे या कालावधीत केली जाते..Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!.परंतु अनेकांनी अधिक कालावधीच्या रोगप्रतिकारक्षम पपई वाणांची लागवड केली. ही लागवड जानेवारी व फेब्रुवारीत झाली. नंदुरबार जिल्ह्यात मात्र लागवड स्थिर आहे. जिल्ह्यातील परंतु जळगाव जिल्ह्यातील लागवड ३० टक्क्यांनी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, जामनेर व अन्य भागात पपई पीक अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात यंदा सुमारे चार हजार हेक्टरवर पपई पीक आहे. धुळ्यातही सुमारे २७०० हेक्टरवर पपई पीक आहे. तर नंदुरबारातील लागवड साडेसात हजार हेक्टरपर्यंत आहे..आगाप पिकाला फटकाआगाप पिकाला यंदा अतिउष्णतेचा मोठा फटका बसला आहे. मेच्या अखेरीस उष्णता अधिक होती. कमाल तापमान ४७ अंश सेल्सीअस काही भागात होते. याचा फटका एप्रिल व मे मध्ये लागवड केलेल्या व आगाप पिकाला बसला आहे. काही शेतकऱ्यांचे पपई पीक काढून फेकावे लागले आहे. पिकाचा उष्णतेपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी क्रॉप कव्हर व अन्य उपाययोजना केल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.