Early Mrig Bahar Banana Plantation: खानदेशात आगाप मृग बहर केळी लागवड सुरू झाली आहे. यंदा लागवड स्थिर राहील. उष्णतेसह नैसर्गिक समस्यांना तोंड देऊन शेतकरी ही लागवड यशस्वी करण्याची धडपड करीत आहेत. त्यात उष्णतेपासून पिकाचा बचाव करण्यासाठी शेतकरी लहान रोपांभोवती क्रॉप कव्हर लावत आहेत. .यंदा खानदेशात सुमारे ५५ ते ५८ हजार हेक्टरवर मृग बहरातील केळी बागांची लागवड होईल. ही लागवड मे अखेरीस किंवा जूनच्या मध्यात सुरू होते. परंतु बाजारातील दर, पाण्याची उपलब्धता व अन्य बाबी लक्षात घेऊन शेतकरी आगाप लागवडी करीत आहेत. परंतु खानदेशातील तापमान सध्या ४२ अंश सेल्सिअसवर आहे. अति उष्णता असतानाही शेतकरी ही लागवड करीत आहेत..Banana Farmer Challenges: दर तुम्हीच ठरवा, पण केळी न्या!.लागवडीसाठी केळी रोपे व कंदांचाही उपयोग केला जात आहे. रोपांना क्रॉप कव्हर लावले जात आहे. तर कमाल शेतकऱ्यांनी प्रत्येक रोपाच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूला ताग, धैंचाची लागवड केली असून, उष्णतेपासून संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. वादळ, गारपिटीची समस्या खानदेशात सुरूच आहे. अशात रोहित्रांतील बिघाड, वीज बंद होणे आदी समस्याही तयार होत असून, यावर ट्रॅक्टरचलित जनित्राचा पर्यायही शेतकऱ्यांनी शोधला आहे..Banana Crop Damage: खानदेशात वादळी पाऊस, उष्णतेचा केळीला फटका.खानदेशात मृग बहरातील केळी लागवडीसाठी जळगावातील रावेर, मुक्ताईनगर, यावल, चोपडा, जामनेर, पाचोरा, भडगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा व अक्कलकुवा हा भाग अग्रेसर आहे. अन्य भागातही कमी क्षेत्रात मृग बहर केळीची लागवड केली जाते. यंदाची लागवडही स्थिर राहील. कारण शेतकरी कमी लागवडीत काटेकोर व्यवस्थापन करून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेक भागात पाणी आहे. परंतु वीज व्यवस्थित नसते. .यामुळेदेखील कमी लागवड करून त्यात शेतकरी परिश्रम घेऊन कार्यवाही करीत आहेत. सर्वाधिक लागवड रावेरात होईल. ही लागवड सुमारे १९ ते २१ हजार हेक्टरवर अपेक्षित आहे. यापाठोपाठ यावल, मुक्ताईनगर आदी भागात लागवड होईल. नंदुरबारातील शहादा तालुक्यातही लागवड मागील तीन वर्षे सतत वाढली असून, तेथे पाच ते साडेपाच हजार हेक्टरवर केळी लागवड अपेक्षित आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातही लागवड दोन हजार हेक्टरपेक्षा अधिक होईल, असा अंदाज आहे..कंद मुबलककेळी लागवडीसाठी कंद मुबलक आहेत. तसेच अनेक कंपन्या रोपांचाही पुरवठा करीत आहेत. रोपांचे दर स्थिर आहेत. १८ ते २१ रुपये प्रतिरोप, असे केळीच्या उतिसंवर्धित रोपांचे दर आहेत. मध्य प्रदेश, गुजरात व अन्य जिल्ह्यांतील कंपन्याही रोपांचा पुरवठा करीत आहेत. तसेच कंदांचे दरही वेगवेगळे आहेत. कंदांमध्ये ग्रॅण्ड नैन वाणाचा उपयोग अधिक होत आहे. अडीच, तीन, चार ते पाच रुपये प्रति कंद असे कंदांचे दर आहेत. पिलबाग किंवा खोडवा केळीमधील कंदांचा उपयोग मात्र लागवडीसाठी करीत नसल्याची स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.