Amravti News: ई-पीकपाहणीचा टक्का वाढत नसल्याने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ३० पर्यंत ई-पीकपाहणीची नोंदणी शेतकऱ्यांना करता येणार आहे. पहिली मुदतवाढ संपुष्टात येत असून जिल्ह्यात आतापर्यंत ६९ टक्के नोंदणी झाली आहे. .कर्जपुरवठ्यासह पीकविमा व नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास भरपाईसाठी पीकपाहणी नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ही नोंदणी करण्यासाठी स्मार्ट फोनवरून ॲपच्या माध्यमातून नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नोंदणी करताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लगत असल्याच्या तक्रारी समोर आल्यात..E Pik Pahani : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ई-पीक पाहणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ.प्रशासकीय यंत्रणेने या त्रुटी दूर करण्यात आल्याचा दावा केला असून त्यानंतर २२ टक्के नोंदणी वाढली. १९ सप्टेंबरपर्यंत अमरावती जिल्ह्यात हे प्रमाण ६९ टक्क्यांवर पोहोचले. जिल्ह्यात पाच लाख १७ हजार ६९३ शेती खाते संख्या असून २ लाख ८३ हजार २६९ खात्यांची नोंदणी मोबाइल ॲपद्वारे झाली आहे..त्याचप्रमाणे ९ लाख १८ हजार १९४ हेक्टर शेती खात्यांचे क्षेत्र असून सर्वसाधारण पेरणीखाली जिल्ह्यात ७ लाख ६२,८८६ हेक्टर क्षेत्र आहे. यातील ५ लाख २८ हजार ७९० हेक्टरची ई-पीक नोंदणी झाली आहे. नोंदणीचे प्रमाण ६९ टक्के असून हा टक्का शंभर टक्के उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आता पुन्हा मुदतवाढ देण्यात आली असून शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. .E Pik Pahani: अमरावती जिल्ह्यातील ई-पीक पाहणीचा टक्का वाढेना.-ई-पीक नोंदणी का आवश्यक कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीकविमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई, शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचे दावे लवकरात लवकर निकाली काढणे यासाठी ई-पीक नोंदणी करणे आवश्यक आहे. .जिल्ह्यातील स्थिती (हेक्टर) एकूण शेती खाते ः ५,१७,६९३ मोबाइल ॲपद्वारे पाहणी केलेले एकूण खाते ः २,८३,२६९ शेती खात्यांचे एकूण क्षेत्र ः ९,१८,१९४ .सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ः ७,६२,८८६ पीकपाहणी केलेले क्षेत्र ः ५,२८,७९० पीकपाहणी झालेली टक्केवारी ः ६९ .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.