India Cotton Market: केंद्र सरकारने शुल्कमुक्त कापूस आयातीला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता डिसेंबरअखेरपर्यंत कापूस आयातीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयामुळे कापूस आयात वाढून देशांतर्गत बाजारातील दरवाढीला लगाम बसण्याची शक्यता आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..केंद्र सरकारने शुल्कमुक्त कापूस आयातीला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता डिसेंबरअखेरपर्यंत कापूस आयातीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या निर्णयामुळे कापूस आयात वाढून देशांतर्गत बाजारातील दरातील तेजीला लगाम बसण्याची शक्यता आहे, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..Cotton Prices Increase: कपाशीच्या उच्चांकी दरामुळे क्षेत्रवाढीची चिन्हे.दुष्काळामुळे यंदा देशातील कापूस उत्पादनात घट झाली आहे. उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी कापसाची विक्री सावधपणे करत आहेत. दुसरीकडे, कापसाला मागणीही चांगली आहे. परिणामी, कापसाच्या दरात वाढ झाली आहे. एरवी हंगामाच्या सुरुवातीला, म्हणजेच ऑक्टोबरमध्ये नवा कापूस बाजारात येऊ लागल्यानंतर दर कमी होतात. मात्र, यंदा उत्पादनात मोठी घट दिसत असल्याने कापसाचे दर टिकून आहेत..हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाचे दर वाढल्याने उद्योगांनी शुल्कमुक्त कापूस आयातीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. उद्योगांच्या मागणीनुसार सरकारनेही शुल्कमुक्त कापूस आयातीला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे..त्यामुळे आता डिसेंबरअखेरपर्यंत उद्योगांना कापूस आयातीवर कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागणार नाही. परिणामी, आयात केलेला कापूस स्वस्त पडणार आहे..Cotton Prices: खुल्या बाजारातील कापूसदरात सुधारणा.आंतरराष्ट्रीय बाजाराला आधार मिळेल?आंतरराष्ट्रीय बाजारात मागील दोन आठवड्यांपासून कापसाच्या दरात चढ-उतार सुरू आहेत. शुक्रवारी (ता. ३०) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापसाचा भाव ७८ सेंटच्या दरम्यान बंद झाला होता. भारत हा कापूस उत्पादनात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने कापूस आयातीवरील शुल्क हटवल्याने आंतरराष्ट्रीय बाजारालाही आधार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी बाजारात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे..कापसातील तेजी थांबणार?देशातील उत्पादनात घट झाल्याने कापसाच्या दरात तेजी आली होती. शुल्कमुक्त आयातीची मुदत ३१ ऑक्टोबरला संपणार होती. त्यामुळे दिवाळीनंतर कापसाच्या दरात चांगली सुधारणा होण्याची शक्यता होती. मात्र, सरकारने शुल्कमुक्त आयातीची मुदत आणखी दोन महिन्यांनी वाढवली आहे. त्यामुळे कापसाच्या दरातील तेजीला मर्यादा येण्याची शक्यता आहे, असे कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितले..शुल्कमुक्त आयात जूनपासूनच सुरूकेंद्र सरकारने जून २०२६ पासूनच कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क हटवले आहे. सरकारने १ जून ते ३१ ऑक्टोबरदरम्यान शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली होती. आता या मुदतीला आणखी दोन महिन्यांची वाढ दिल्याचे सरकारने ३० ऑक्टोबरला अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.