Power Supply Issue: राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा फटका बियाणे उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपशावर निर्बंध आणि कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद करण्याच्या हालचालींमुळे मराठवाडा आणि विदर्भातील बियाणे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर करारबद्ध बीजोत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी आणि वीजपुरवठ्याबाबत विशेष सवलत द्यावी, अशी मागणी शेतकरी आणि बियाणे कंपन्यांनी शासनाकडे केली आहे..मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागांत रब्बी हंगामात साधारणतः १० ते १५ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते. देशातील एकूण कांदा बियाणे उत्पादनापैकी सुमारे ८० टक्के उत्पादन या दोन विभागांत होते. जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये बीजोत्पादनासाठी पोषक हवामान आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे गेल्या ३० ते ४० वर्षांपासून या भागात व्यावसायिक पद्धतीने बीजोत्पादनाचे कार्यक्रम राबविले जात आहेत..Sugarcane Farmers Issues: दुष्काळामुळे ऊस उत्पादनात घट; शेतकऱ्यांनी रामदास आठवलें समोर मांडल्या व्यथा.पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बीजोत्पादनाने या भागात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. देशांतर्गत तसेच परदेशातील बियाणे कंपन्या शेतकऱ्यांशी करार करून विविध पिकांचे बीजोत्पादन घेतात. या व्यवसायातून हजारो शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. तसेच कुशल शेतमजूर आणि संबंधित घटकांना रोजगार उपलब्ध होतो. विशिष्ट हवामान आणि भौगोलिक परिस्थितीतच काही पिकांचे दर्जेदार बियाणे तयार होत असल्याने या भागातील बीजोत्पादन क्षेत्राला विशेष महत्त्व आहे..Indian Farmers Issues: कर्जमाफी, हमीभावाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात.माझी एकूण १५ एकर शेती असून, गेल्या १३ ते १४ वर्षांपासून चार ते पाच एकरांवर कांदा बीजोत्पादन घेत आहे. निसर्गाची साथ मिळाल्यास त्यातून चार ते साडेचार क्विंटल बियाणे उत्पादन मिळते. धरणाचे पाणी बंद केले आहे. त्यामुळे बीजोत्पादनाचा कार्यक्रम घेणे शक्य होत नाही.- मधुकर गाढवे, बीजोत्पादक, सालगाव, जि. जालना.कमी पाण्यातही बीजोत्पादन घेणे शक्य आहे. मात्र शासनाने पाणीच बंद केले, तर शेतकऱ्यांनी बीजोत्पादन कसे करायचे, हा प्रश्न आहे. शासनाने या बाबत योग्य विचार करावा. अन्यथा पुढील वर्षी बियाण्यांची मोठी समस्या निर्माण होऊ शकते.- प्रभाकर शिंदे, बियाणे उद्योजक, पंचगंगा सीड्स.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.