Solapur News : भेंड (ता. माढा) येथे शेतकऱ्यांना फवारणीसाठी माफक दरात ड्रोन सेवेचा प्रारंभ करण्यात आला. भेंड ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येणाऱ्या या सुविधेचा प्रारंभ ‘सकाळ’चे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी श्री. पाटील यांनी ग्रामपंचायत भेंड, इक्रिसॅट व अटल भूजलच्या मार्फत गावामध्ये झालेल्या विविध विकास कामांचे कौतुक केले..भेंड गावाने एआय व ड्रोनच्या सहायाने शेतीत नवे पर्व सुरू केले आहे. गावात ११०० हेक्टर बागायती क्षेत्र आहे. गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने विकासाची दिशा शेतीकेंद्रित ठेवून सुरू झालेला, हा उपक्रम अनेक गावांसाठी पथदर्शी ठरणार आहे. गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे लोकसहभागातून हाती घेण्यात आली..अटल भूजल योजनेअंतर्गत १२५ रिचार्ज शॉफ्ट उभारण्यात आले. जलसंधारणात झालेल्या या अत्युच्च कामगिरीबद्दल शासनाचे पन्नास लाख रुपयांचे बक्षीस गावाने पटकावले. याशिवाय ‘स्वच्छ व सुंदर गाव’ योजनेचे २० लाख, ‘सुंदर शाळा’ योजनेचे १० लाख व पाणी फाउंडेशनकडून सलग दोन वर्षे प्रत्येकी तीन लाखांची बक्षिसे गावाने मिळविली आहेत. .Namo Drone Didi Scheme : नमो ड्रोन दीदी योजनेतून महाराष्ट्रातील ४७ गटांना अनुदान.या निधीमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला गती तर मिळालीच, याच बक्षिसांच्या रकमेतूनच ग्रामपंचायतकडून ड्रोनची खरेदी करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाच ड्रोनद्वारे फवारणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. .Drone Farming: ड्रोनद्वारे फवारणीचे तंत्र; आधुनिक शेतीचे नवीन मॉडेल.फवारणीसाठी शेतकऱ्यांना माफक दरात ड्रोन उपलब्ध झाल्याने त्यांची आर्थिक बचत तर होईलच शिवाय ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. यावेळी माजी सरपंच डॉ. संतोष दळवी, इक्रिसॅटचे सागर रामदासी आदी उपस्थित होते.. इक्रिसॅटचे सहकार्यगेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय इक्रिसॅट संस्था येथे जलसंधारण व पीक पद्धतीवर अभ्यास करत आहे. अटल भूजल योजना व इक्रिसॅटच्या माध्यमातून गावातील पाझर तलावालगत ११०० फूट लांबीची व १५ फूट उंचीची कोअर वॉल बांधण्यात आली. .या भिंतीमुळे सुमारे ३०० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. इक्रिसॅटने गावात ४० हून अधिक ठिकाणी सेन्सर बसवले आहेत. या माध्यमातून हवामानाचा अचूक अंदाज, पिकांवरील रोगाची पूर्वकल्पना, तसेच पिकाला किती आणि केव्हा पाणी द्यायचे याचे मार्गदर्शन मिळत आहे. यामुळे पाण्याची बचत व रोगनियंत्रण सहज साध्य होणार आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.