Drip Irrigation Subsidy: कमी पाण्याच्या परिस्थितीत, दुष्काळात सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन फायद्याचे ठरते. परंतु अनेक शेतकरी ठिबक सिंचन महागडे असल्यामुळे त्याकडे दूर्लक्ष करतात. परंतु ठिबक सिंचन हा शेतकऱ्याचा खर्च नसून गुंतवणूकच असते. चांगली काळजी घेतल्यास ठिबक संच ८ ते १० वर्ष टिकतो. तसेच ठिबक सिंचनामुळे पाण्याची ५५ टक्क्यांपर्यंत बचत होते आणि जमिनीत जास्त काळासाठी वाफसा स्थिती राहत असल्याने उत्पादनवाढीत मदत होते. .राज्यातील ८० टक्के शेतीचे क्षेत्र हे कोरडवाहू आहे. अल्पभूधारक शेतकरी ठिबक सिंचन महागडे असल्याचे कारण देऊन नाकारतात. परंतु ठिबक सिंचन हा शेतीतील खर्च नसून गुंतवणूक असते. शेतीतील तज्ज्ञ, शास्त्रज्ञ वारंवार ठिबक सिंचनाचे फायदे सांगत असतात. विशेषत: कमी पाण्याच्या परिस्थितीमध्ये ही व्यवस्था जास्त फायद्याची ठरते..Drip Irrigation : ठिबक बसवा; जास्त पाणी लागणारी पिके घेऊ नका.ठिबक सिंचनाचे फायदेठिबक सिंचनाने जमिनीत थेंबा थेंबाने पिकाच्या मुळांजवळ पाणी दिले जाते. त्यामुळे कमी पाण्यात आणि दुष्काळातही पाणी उपलब्ध असल्यास पीक घेणे शक्य होते.ठिबक सिंचनाच्या वापराने ५५ टक्के पाण्याची बचत होते. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पाणी. त्यामुळे कमी पाण्यातही पीक घेता येते. तसेच ऊसासारख्या, कापसासारख्या पिकाला पाण्याच्या जास्त पाळ्या देता येतात..थेंबा-थेंबाने पाणी दिल्यामुळे जमिनीत वाफसा स्थिती कायम टिकून राहते. वाफसा स्थिती म्हणजेच जमिनीत २५ टक्के हवा, २५ टक्के पाणी आणि ५० टक्के माती आणि सेंद्रिय कर्ब या प्रमाणात असतात.वाफसा स्थितीमध्ये पिकाच्या मुळांना हवा आणि पाणी उपलब्ध होते. त्यामुळे त्यांची वाढ उत्तमरीत्या होते. मुळांची वाढ चांगली झाली की पिकाची उत्पादकता वाढते. परिणामी उत्पादनात आणि उत्पन्नात भर पडते..Irrigation Checking: सिंचन सुरु करण्यापूर्वी तपासा ५ गोष्टी, अशी करा तपासणी.एरवी दाणेदार खत देताना जमिनीत ओलावा असावा लागतो. तसेच दिलेल्या खतांपैकी फार कमी टक्के प्रमाणात खते पिकाला मिळतात, बाकी खताचा अपव्यय होतो. ते खत जमिनीत तसेच राहून जमीन हळूहळू क्षारयुक्त होऊ लागते. परंतु पाण्यात विरघळणारी खते जमिनीतून दिल्यास ती थेट पिकाच्या मुळांजवळ दिली जातात. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो. खतांचा अपव्यय होत नाही. पाण्यातून विद्राव्य खते देताना त्यांची मात्राही कमी लागते. त्यामुळे खतांवरील खर्च कमी होतो.अशा प्रकारे ठिबक सिंचनाचा फायदा फक्त खत आणि पाण्याच्या बचतीसाठी नाही तर जमिनीत वाफसा टिकवण्यासाठी आणि पिकाच्या उत्पादनवाढीसाठीही होतो.ठिबक सिंचनाच्या मदतीने शेतकरी विविध पिकांची लागवड करु शकतात. केवळ कोरडवाहू पिके घेण्याचे बंधन इथे राहत नाही. भाजीपाला पिके, नगदी पिके, फळबागा या सर्वांसाठी ठिबक सिंचन फायद्याचे असते..आर्थिक गणित परवडते का?ठिबक सिंचनाचा संचाची चांगली देखभाल केल्यास तो जवळपास ८ ते १० वर्ष टिकतो. त्यामुळे ठिबक सिंचनाचा खर्च एक दिवसासाठी असला तरी ती गुंतवणूक पुढे दहा वर्षांसाठी आहे हा विचार केल्यास दर वर्षीचा खर्च कमी होतो.उदा. जर एक ठिबक सिंचनाचा संच घेण्यासाठी ४० हजार रुपये लागतात. परंतु तो संच १० वर्ष टिकत असेल तर दर वर्षासाठीचा खर्च केवळ ४ हजार इतकाच येतो.त्यामुळे ठिबक सिंचन संचाच्या खरेदीवेळी खर्च जास्त वाटत असला तरी दीर्घकाळासाठी ठिबक सिंचन शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरतो..संचासाठी अनुदानठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून योजनांच्या मदतीने अनुदान मिळते. पंतप्रधान राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकासाठी सरकार निधी देते. याच्या मदतीने शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचाच्या ४५ ते ५५ टक्के अनुदान मिळते. यासाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी अर्ज करता येतो..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.