अरुण देशमुखऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा आराखडा करताना जमिनीचा प्रकार, जमिनीत पाण्याचे होणारे उभे आडवे प्रसारण लक्षात घ्यावे. याचबरोबरीने पीक नियोजन, दोन ओळींतील आणि दोन रोपांतील अंतर, जोमदार वाढीच्या अवस्थेतील असणारी पाण्याची गरज या बाबी लक्षात घ्याव्यात. .ऊस पिकामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या निष्कर्षानुसार ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन आणि रासायनिक खतांचा वापर तांत्रिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावयाचा असेल तर शेतात सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात पाणी, खतांचे वितरण अतिशय महत्त्वाचे आहे. ठिबक सिंचन करायच्या क्षेत्राची लांबी, रुंदी, शेताला असणारा चढ व उतार, पाण्याचे साधनाचे ठिबक करावयाच्या क्षेत्रापासूनचे अंतर, उपलब्ध पंप, पंपाचा हेडनुसार प्रती सेकंद मिळणारा प्रवाह या सर्व बाबींची योग्य माहिती घेऊन आराखडा केल्याने ठिबक सिंचन वापरताना सर्व ठिकाणी योग्य दाब मिळतो. सर्व शेतामध्ये पाणी, खतांचे एकसमान वितरण होते..Sugarcane Farming: बेणे अभ्यासपूर्वक निवडा : डॉ. धैर्यशील लाड.योग्य ठिबक सिंचन पद्धतीशक्यतो १६ मी.मी. व्यासाची इनलाइन ठिबक वापरणे फायदेशीर असते. मध्यम खोल जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर कमीत कमी १.५० मीटर (५ फूट) असावे तर जास्त खोलीच्या काळ्या जमिनीत दोन ठिबक सिंचन नळ्यातील अंतर १.८० मीटर (६ फूट) असावे.दोन ड्रीपरमधील अंतर ४० सेंमी असावे. ड्रीपरचा प्रवाह दर ताशी २ लिटर असावा..पृष्ठभागाखालील ठिबक सिंचनासाठी दाब नियंत्रित इनलाइन ठिबक वापरणे फायदेशीर आहे. दोन ड्रीपरमधील अंतर ४० सेंमी आणि ड्रीपरचा प्रवाह दर ताशी १.६ किंवा २ लिटर असावा. एका शिफ्टमध्ये जास्त क्षेत्र ओलिताखालील आणण्यासाठी ताशी एक लिटर प्रवाह देणारे ड्रीपर असणारी इनलाइन वापरणे फायदेशीर आहे.जमिनीच्या प्रकारानुसार योग्य ठिबक सिंचन पद्धतीची निवड करावी. दोन ठिबक नळ्यांमधील योग्य अंतर व ड्रीपरचा प्रवाह निश्चित करणे महत्त्वाचे आहे..AI in Sugarcane Farming: सुरु उसाला एआयची जोड देऊन उत्पादन कसे वाढवता येईल?.कमी कालावधीमध्ये सिंचन पूर्ण करण्यासाठी जास्त प्रवाह असणारे ड्रीपर वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो परंतु हे शास्त्रीय दृष्टिकोनातून चुकीचे आहे, कारण जास्त प्रवाहाचा ड्रीपर वापरल्यास दिलेले पाणी आणि खते मुळाच्या खाली निचऱ्यावाटे निघून जातात. पाणी व खते देण्याची कार्यक्षमता फारच कमी होते, खर्च वाढतो. त्याचा पीक वाढीसाठी काहीही उपयोग होत नाही..जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धती (सबसरफेस ड्रीप)या पद्धतीमध्ये पाणी आणि खते थेट पिकाच्या मुळाजवळ दिली जातात. त्यामुळे उसाची वाढ जोमदार होते. पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. वाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये पाणी, खताच्या कार्यक्षम वापरामुळे उत्पादन आणि साखर उताऱ्यात भरीव वाढ होते. या पद्धतीखाली चांगले व्यवस्थापन केल्यास एक लागण पीक आणि तीन ते चार खोडवा पिके अतिशय उत्तमरीत्या घेता येतात..पाण्याचा जमिनीतील प्रवाह हा मुख्यत्वे कॅपीलरी दाबामुळे नियंत्रित केला जातो. हा दाब सर्व दिशांना सारखा असतो. गुरुत्वाकर्षणाचा दाब हा स्थिर व खालच्या दिशेला असतो. जशी जमीन ओली होते तसा कॅपीलरी दाब कमी होत जातो. कोरड्या जमिनीत कॅपीलरीचा दाब हा गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावापेक्षा जास्त असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सर्व दिशांना सारखा असतो. जेव्हा जमीन ओली होत जाते तेव्हा जमिनीतील सर्व पोकळ्यांमध्ये पाणी भरल्याने कॅपीलरी दाब कमी होतो, गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव वाढतो आणि पाण्याचा प्रवाह उताराच्या बाजूला सुरु होतो. जर हलके पाणी दिले तर कॅपीलरी दाबाने त्यावर नियंत्रण ठेवता येते, पाण्याची कार्यक्षमता वाढविता येते.- अरुण देशमुख ९५४५४५६९०२(उप सरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग,नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा. लि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.