Sangli News : देशातील शेतकऱ्यांचा ड्रॅगन फ्रूट लागवडीकडे कल वाढला आहे. २०२४-२५ या वर्षात १६ हजार ९०० हेक्टरखाली ड्रॅगन फ्रुटचे क्षेत्र आहे. दरवर्षी अंदाजे २५ टक्के म्हणजे चार हजार हेक्टर नव्याने लागवड होत असल्याचा दावा महाड्रॅगन फ्रूट असोसिएशनने केला आहे..देशातील विविध राज्यांत नैसर्गिक संकटामुळे द्राक्ष, डाळिंब यांसह अन्य फळांना मोठा फटका बसत आहे. परिणामी डाळिंब, द्राक्षे ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना अतिपाऊस आणि दुष्काळ यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी पर्यायी फळ पिकांचा अवलंब करत असल्याचे चित्र आहे. .Dragon Fruit Rate: ड्रॅगन फ्रूट प्रति किलोला ७० ते १२५ रुपये दर.कोरडवाहू पट्ट्यासह दुष्काळ आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. ड्रॅगन फ्रूटला अनेक राज्यात पोषक असे वातावरणही आहे. तसेच कमी पाण्यात आणि कमी खर्चात असणाऱ्या ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे..चार वर्षांपूर्वी देशातील १४ राज्यांत ड्रॅगन फ्रूटची लागवड होती. तीन वर्षांत चार राज्यांत नव्याने लागवड झाली आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आणि मिझोराम या चार राज्यांत सर्वाधिक लागवड आहे. ड्रॅगन फ्रूटचा हंगाम मेपासून ते नोव्हेंबरपर्यंत असून पाच वेळा काढणी केली जाते. .Dragon Fruit Rate : पहिल्या बहरातील ड्रॅगन फ्रूटची विक्री अंतिम टप्प्यात.प्रामुख्याने देशांतर्गतच बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत असल्याचे चित्र आहे. बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटला चांगली मागणी असून दरही अपेक्षित मिळतात. त्यामुळे देशात दरवर्षी ड्रॅगन फ्रूटच्या क्षेत्रात सरासरी ४ हजार हेक्टरने वाढ होत आहे. २०२५-२६ या वर्षांत २१ हजार हेक्टरवर लागवड झाली असल्याचेही महाड्रॅगन फ्रूट असोसिएशने सांगितले आहे..देशातील लागवड दृष्टिक्षेपात (क्षेत्र हेक्टर)वर्ष---लागवड२०२२-२३ ...५३००२०२३-२४...१४५१०२०२४-२५...१६९००राज्यनिहाय क्षेत्र (हेक्टर)आंध्र प्रदेश ः ७९७०गुजरात ः १२३०महाराष्ट्र ः १५३०मिझोराम ः ३५७०.ड्रॅगन फ्रूटची देशांतर्गत मागणी वाढत असल्याने देशात ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढत आहे. मात्र आंध्र प्रदेश आणि मिझोराम या दोन राज्यांतील क्षेत्राबाबत साशंकता निर्माण आहे. देशात दोन सरकार मान्यता तर दोन खासगी रोपवाटिका आहेत. सरकार मान्य रोपवाटिकांची संख्या वाढणे आवश्यक आहे.- डॉ. मधुकर पोतदार, अध्यक्ष, महा ड्रॅगन फ्रूट असोसिएशन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.