Washim News: भारतीय कृषी संशोधन परिषदअंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP)समन्वयक डॉ. सचिन सुरोशे यांनी शनिवारी (ता.२४) वाशीम जिल्ह्यास भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यातील प्रगतशील मधमाशीपालक राजूभाऊ जोगदंड तसेच सोनखास (ता. वाशीम) येथील अनिल निवृत्ती गोरे यांच्या शेतावरील मधमाशीपालन प्रकल्पास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सखोल तांत्रिक संवाद साधला. .यावेळी त्यांनी वाशीम जिल्ह्यात मधमाशीपालन क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे तसेच प्रगत कार्याचे विशेष कौतुक केले. सद्यःस्थितीत मधमाशीपालन क्षेत्रासाठी गंभीर आव्हान ठरत असलेल्या लहान मधमाशी पोळे, भुंगा या किडीबाबत डॉ. सुरोशे यांनी सविस्तर वैज्ञानिक माहिती देत प्रतिबंधात्मक उपाययोजना, एकात्मिक कीड व्यवस्थापन व योग्य व्यवस्थापन तंत्राबाबत मार्गदर्शन केले..Beekeeping Conservation: बसवंत मधमाशी केंद्राचे कार्य व्यापक कृषीहिताचे.जिल्ह्यात पिकांचे विविधीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने परागीभवनाच्या दृष्टीने मधमाशीपालनाचे महत्त्व अधिक वाढले असल्याचे त्यांनी नमूद केले. मधमाशीपालन हा एक महत्त्वाचा पूरक व्यवसाय असून तो स्वयंरोजगार निर्मितीसोबतच शेती उत्पादनक्षमता व गुणवत्तावाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले. .Honey Village Scheme: ‘मधाचे गाव’ योजना देणार रोजगाराचा गोडवा .मधमाशीपालकांसाठी तांत्रिक मार्गदर्शनासोबतच आवश्यक प्रशिक्षण व क्षमतावर्धन कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्रासोबत राबविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या दौऱ्यादरम्यान डॉ. सुरोशे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या वाशीम येथील कृषी संशोधन केंद्राला भेट देऊन प्रात्यक्षिक शेतावरील विविध पिकांची पाहणी केली. .तेथे सुरू असलेल्या संशोधन व विस्तार कार्याची माहिती घेतली. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त संजय उकळकर, केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ.आर.एल.काळे, पीक संरक्षण तज्ञ राजेश डवरे, कृषी सहाय्यक चैताली शिंदे तसेच कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.