Akola News : सेवा सहकारी सोसायट्यांनी आपल्या स्तरावरून कामकाजात सक्रिय सहभाग वाढवावा. अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी समन्वय ठेवून सोसायट्या ग्राहकाभिमुख करण्याची तसेच पारदर्शक व चोख व्यवहार करण्याची काळाची गरज आहे, असे मत अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डाॅ. संतोषकुमार कोरपे यांनी केले. .जिल्हा बँकेची ११४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. १७) झाली. या वेळी अध्यक्षस्थानावरून श्री. कोरपे बोलत होते. ते म्हणाले, की प्रत्येक गावात शाखा उभारण्याऐवजी बँकेने मायक्रो एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याद्वारे बँक मित्रांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सुलभ होणार आहेत..Akola-Washim DCC Bank : देशातील पहिली जिल्हा सहकारी बँक दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.तसेच, ग्रामीण सूर्यघर योजना राबवून गावोगावी सौर ऊर्जेचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेत बँक अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करीत असून अनेकांनी स्वतःच्या घरी वीजनिर्मिती करून एमएसईबीला पर्याय निर्माण केला आहे..जे सभासद १० वर्षांपासून थकबाकीदार आहेत, अशा सभासदांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ओटीएस योजना राबविण्यात आली असून, यात शेतकऱ्यांनी केवळ मुद्दल भरल्यास ते नव्याने कर्ज घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत..Cooperative Bank Award : अकोला-वाशीम जिल्हा बँकेला पुरस्कार प्रदान.व्याजातील आर्थिक तूट जिल्हा बँकेच्या सहकार्याने भरून काढली जाणार असल्याने या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय बँकेमार्फत विकासात्मक कर्जे, ठिबक सिंचनासह विविध योजना अल्प व्याजदरात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले..डॉ. कोरपे यांना (कै.) विष्णू अण्णा पाटील जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने तसेच विविध सोसायट्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी वार्षिक अहवाल सादर केला. उपाध्यक्ष श्रीधरराव कानकिरड, रमेशराव हिंगणकर, डाॅ. सुभाष कोरपे, वामनराव देशमुख, आमदार अमित झनक, सुभाषराव ठाकरे आदी उपस्थित होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.