Kolhapur News: ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे गुरुवारी (दि. २६ मार्च) पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारे शाहू विचारांचे इतिहासकार म्हणून त्यांची ओळख होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. कोल्हापुरात गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. .डॉ. जयसिंगराव पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्याच्या तडसर गावात झाला. त्यांनी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामधून एम. ए. पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पीएचडी संपादन केली. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा आणि राजश्री शाहू स्मारक असे २५ हून अधिक ग्रंथ लिहिले. विविध इतिहास परिषदा आणि संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांचे ४५ हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक सदस्य होते. त्यांनी या परिषदेचे तीन वर्षे अध्यक्षपदही भूषविले. .ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमुल्य असा ठेवा उपलब्ध झाला. अशा डॉ जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे आपण इतिहास संशोधन क्षेत्रातील तत्वनिष्ठ, व्यासंगी मार्गदर्शकाला मुकलो आहोत, अशी शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. .त्यांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावणारी आहे. इतिहासाचा केवळ अभ्यास न करता तो जिवंत ठेवण्याचं कार्य त्यांनी आयुष्यभर केलं. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब, महाराणी ताराराणी आणि इतर थोर व्यक्तिमत्त्वांचा त्यांनी घेतलेला सखोल वेध पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून त्यांनी इतिहास लेखनाला नवी दिशा दिली. त्यांच्या संशोधनातून आणि लेखनातून महाराष्ट्राच्या इतिहासाला एक समृद्ध, संदर्भपूर्ण भक्कम पाया मिळाला. असा तत्वनिष्ठ, व्यासंगी आणि शांतपणे मोठं काम करणारा संशोधक हरपणं ही राज्यासाठी मोठी पोकळी आहे, असे फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. .Maratha Seva Sangh: सत्ता उलथवून टाकण्याचे सामर्थ्य मराठ्यांत : खेडेकर.डॉ. जयसिंगराव पवार यांनी आयुष्यभर महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्याचे काम केले. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर त्यांनी केलेले संशोधन मार्गदर्शक ठरले आहे. त्यांच्या निधनामुळे ऐतिहासिक संशोधन क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत..Maratha Panchayat: ‘मराठा पंचायती’द्वारे संवादाचा नवा मार्ग.डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.