Biodiverse Farming Methods : परभणी मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली असून, ‘जगा आणि जगू द्या’ या संकल्पनेनुसार तिचे जतन करणे काळाची गरज आहे. देशी बियाण्यांचे संवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा, परंतु दुर्लक्षित विषय आहे. शेतकऱ्यांनी उत्कृष्ट बियाण्यांची निवड करून त्यांचे संवर्धन करण्याची परंपरा पुन्हा सुरू करावी. तसेच उत्पादन खर्च कमी करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी, असे प्रतिपादन माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी केले..महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प (विशेष कक्ष), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘मराठवाडा बीज संवर्धक संवाद व कार्यशाळे’च्या उद्घाटनप्रसंगी गुरुवारी (ता. ६) ते बोलत होते..Dr Jayant Patil Birth Centenary: डॉ. जयंतराव पाटील : शाश्वत शेतीचे शिल्पकार.यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) संचालक पूनम पाटे, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे प्रकल्प अधिकारी रवींद्र वानखेडे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन उपसंचालक डॉ. सुनीता पवार, बायफचे उपाध्यक्ष डॉ. रविराज जाधव तसेच संशोधक संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती..कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी म्हणाले, की देशी वाणांचे जनुक संवर्धन करणारे शेतकरी हे समाजाचे खरे मित्र आहेत. विद्यापीठ परिसर जैवविविधतेने समृद्ध असून, त्याचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या सहकार्याने विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे..SATHI Portal: शेतकऱ्यांचा सच्चा ‘साथी’.पूनम पाटे म्हणाल्या, की जनुक संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख निर्माण करून त्यांना राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. रविराज जाधव यांनी हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला असला, तरी जैवविविधतेच्या संवर्धनाकडे अपेक्षित लक्ष गेले नसल्याची खंत व्यक्त केली..संशोधक संजय पाटील म्हणाले, की देशी बियाणे हे शेतीचा आत्मा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. शेतकऱ्यांकडील पारंपरिक ज्ञानाचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण करून त्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. या कार्यशाळेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७५ हून अधिक बीज संवर्धक शेतकरी सहभागी झाले होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.