Padma Shri D Y Patil: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूरमध्ये निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ते काँग्रेस आमदार सतेज पाटील आणि उद्योगपती संजय पाटील यांचे ते वडील होत..त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान खूप मोठे आहे. शेतकरी कुटुंबातून पुढे येत महापौर, आमदार, राज्यपाल असा त्यांचा प्रवास राहिला. डी. वाय. पाटील यांचे पूर्ण नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील असे असून, त्यांना प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ ओळखले जात होते. त्यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिले. तसेच ते डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक होते..डी. वाय. पाटील यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला होता. त्यांनी १९५७ ते १९६२ दरम्यानच्या कालावधीत कोल्हापूर शहराचे महापौर होते. त्यानंतर १९६७ ते १९७२ या काळात पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. वयाच्या ४५व्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत शिक्षण क्षेत्रातील कामाला सुरुवात केली. त्यांनी अनेक संस्था उभारून शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला..Agriculture Education : डी. वाय. पाटील विद्यापीठामुळे कृषी शिक्षणाची गंगा अवतरली.डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व हरपले- मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले आहे. डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास महापौर, लोकप्रतिनिधी आणि पुढे विविध राज्यांचे राज्यपाल अशा महत्त्वाच्या घटनात्मक पदापर्यंत पोहोचला. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून समाजातील सर्वसामान्य आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची संधी पोहोचविण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले. .D Y Patil Agricultural University : डी. वाय. पाटील कृषी विद्यापिठाला गांडूळ खत चाळणी यंत्रासाठी भारतीय पेटंट.शिक्षण आणि वैद्यकीय संस्थांचे जाळे उभारण्याबरोबरच त्यांनी नवी मुंबईत जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल साकारले, तसेच कृषी व सामाजिक क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या निधनाने एक दूरदर्शी व्यक्तिमत्त्व हरपले आहे, अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. .'एक शिक्षणमहर्षी गमावला'- एकनाथ शिंदेडॉ. डी. वाय. पाटील यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक द्रष्टा नेता, महान शिक्षणमहर्षी आणि दिलदार मार्गदर्शक गमावला असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्य क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे महान शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र आणि शैक्षणिक विश्वावर शोकाकळा पसरली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. .''केवळ संस्था उभ्या न करता, 'Academic Excellence' आणि 'Holistic Education' या तत्त्वांवर आधारित शिक्षण देऊन त्यांनी देशातील उच्च शिक्षणाला एक नवी दिशा दिली. आज डी. वाय. पाटील विद्यापीठात अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन, फार्मसी, लॉ, आर्किटेक्चर अशा १६ हून अधिक विद्याशाखांमध्ये १४६ हून अधिक अभ्यासक्रम चालवले जातात. संपूर्ण देशात तब्बल ७ स्वतंत्र विद्यापीठे उभी करण्याचा अद्वितीय आणि ऐतिहासिक विक्रम त्यांच्याच नावावर आहे..कोल्हापूर, पुणे आणि नवी मुंबई या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये त्यांनी उभारलेली रुग्णालये लाखो रुग्णांसाठी वरदान ठरली आहेत. तसेच नवी मुंबईत जगातील ६ व्या क्रमांकाचे अत्याधुनिक 'डी. वाय. पाटील स्टेडियम' उभारून त्यांनी क्रीडा विश्वात एक नवा वस्तुपाठ निर्माण केला..बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी आपल्या पदाची गरिमा वाढवली. एक संस्था उभी करणे सोपे असते, पण ती निष्ठेने, शिस्तीने आणि सामाजिक भान ठेवून चालवणे अत्यंत कठीण असते; डी. वाय. पाटील यांनी ते लीलया करून दाखवले..ईश्वर डॉ. डी. वाय. पाटील यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो व पाटील परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो, हीच प्रार्थना! डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली!'' असे शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. .त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारं- शरद पवार डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ''शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांत त्यांनी उभारलेलं अचाट कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक दूरदर्शी समाजहितैषी व्यक्तिमत्त्व गमावले आहे. अनेक दशकांचा त्यांचा स्नेह, जिव्हाळा आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवण्याची त्यांची तळमळ कायम स्मरणात राहील. डॉ. डी. वाय. पाटील ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो,'' असे पवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.