Regional Development: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता सर्वसाधारण योजनेसाठी ७९४ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १०४ कोटी रुपये, तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी ११ कोटी २१ लाख रुपये अशा एकूण ९०९ कोटी २१ लाख रुपयांच्या तरतुदीस शुक्रवारी (ता. १५) झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली..जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा नियोजन सभागृहात पार पडली. बैठकीस सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, इमाव कल्याण, दुग्ध विकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, खासदार डॉ. कल्याण काळे, विधान परिषद सदस्य आ. अंबादास दानवे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य आ. प्रदीप जयस्वाल, आ. रमेश बोरनारे, आ. प्रशांत बंब, आ. संजना जाधव, आ. विलास भुमरे, .Pandharpur Corridor Project: पंढरपूर कॉरिडॉरला अखेर मंजुरी.जिल्हा परिषद उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, जिल्ह्याचे पालक सचिव हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते..Satara DPDC Meeting: साताऱ्यासाठी ३४६ कोटींच्या वाढीव निधीची मागणी.पालकमंत्री शिरसाट म्हणाले, की जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी कायदा व सुव्यवस्थेसह सर्व क्षेत्रांत चांगली स्थिती राखणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे निधी उपलब्ध करून दिल्याने सेवांचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारली आहे. .तसेच महानगरपालिकेत ड्रेनेज सफाईसाठी रोबोटच्या वापरासाठी निधी देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले..मंजूर खर्चासही मान्यताजिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२५-२६ या वर्षासाठी मंजूर नियतव्ययातील सर्वसाधारण योजनेचे ७३५ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेचे १०४ कोटी रुपये आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेचे १० कोटी ४६ लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली. २०२५-२६ या वर्षातील मंजूर नियतव्ययाचा १०० टक्के खर्च झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच सन २०२६-२७ च्या नियतव्ययालाही मान्यता देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.