Agricultural Guidance: यंदाच्या मॉन्सूनवर ‘एल निनो’चा प्रभाव दिसून येत आहे. जून महिन्यात जिल्ह्यातील सरासरी पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असून केवळ १०.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची माहिती द्यावी. अपुऱ्या पावसाच्या परिस्थितीत पेरणीची घाई करू नये, यासाठी व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या..जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात शुक्रवारी (ता. १९) कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक भिवा लवटे यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते..Kharif Sowing Delayed: खरिपाच्या पेरण्या रखडल्याने बियाणे विक्रीवर परिणाम.पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करावी पेरणीजिल्हाधिकारी श्री. प्रसाद म्हणाले, की पावसाची अचूक माहिती मिळण्यासाठी सर्व हवामान केंद्रांची तपासणी करावी. किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस होऊन जमिनीत पेरणीयोग्य ओल निर्माण होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी टाळावी. पावसातील संभाव्य खंड लक्षात घेता संपूर्ण क्षेत्रात एकाच वेळी पेरणी न करता टप्प्याटप्प्याने पेरणी करावी. त्यामुळे आर्थिक जोखीम कमी होण्यास मदत होईल. दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्यांनी घरचेच प्रमाणित बियाणे राखीव ठेवावे, असेही त्यांनी सांगितले..Re Sowing Crisis: रत्नागिरी जिल्ह्यात उन्हामुळे भात रोपे करपली; दुबार पेरणीचे संकट.मिश्र पिकांना द्यावे प्राधान्ययंदा कमी पावसाच्या अंदाजामुळे ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद आणि तीळ यांसारख्या पारंपरिक व कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. पिकांच्या जोखीम व्यवस्थापनासाठी तूर + सोयाबीन, बाजरी + तूर किंवा कापूस + मूग यांसारख्या मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. जिल्ह्यातील एकूण १,६०५ गावांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले..खते, बियाण्यांचा पुरेसा साठाजिल्ह्यात खते आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या युरियाचा ४२ हजार ००८ टन आणि डीएपीचा १३ हजार ३९८ टन साठा उपलब्ध असून वितरण प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद यांनी आभार मानले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.