Parbhani News : अतिवृष्टीमुळे झालेली पीकहानी मोठी आहे. शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे असून त्यांना हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके देण्यास तत्पर आहे..रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, करडई, जवस आदी पिकांची नियोजनबद्ध केल्यास खरिपातील नुकसानीची भरपाई करणे शक्य होईल असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी केले.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचलनालया अंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातर्फे माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या उपक्रमांतर्गत आर्वी (ता. परभणी) येथे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसोबत बुधवारी (ता. ८) प्रक्षेत्र भेट आणि गटचर्चा आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. .Crop Damage Compensation : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर शिवसैनिक आक्रमक.संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, मधुकर मांडगे, आशिष अंभोरे आदींची उपस्थिती होती. डॉ. इंद्र मणी म्हणाले, की या वर्षीची परिस्थिती ही बदलत्या हवामानाचे स्पष्ट उदाहरण आहे. भविष्यात अशा घटना वारंवार घडू शकतात. .Rain Crop Damage : सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीने ४२०४ हेक्टरची हानी.मनोबल हीच खरी ताकद असून संकटाच्या काळातही नवी संधी निर्माण करता येते. शेतकऱ्यांनी हवामान सुसंगत पीक पद्धती, जलसंधारण तंत्रज्ञान, मृद्संवर्धन, ताण सहनशील वाणांचा अवलंब करणे गरजेचे आहे. कृषी हा आपला संस्कार आहे आणि संशोधन, तंत्रज्ञान व परिश्रम यांच्या एकत्रित शक्तीने आपण कोणतेही संकट पार करू शकतो. .डॉ. अहिरे म्हणाले, की मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाचे शास्त्रज्ञ प्रत्यक्ष शेतांवर भेट देऊन तांत्रिक मार्गदर्शन करत आहेत. या संकट काळात शेतकऱ्यांना योग्य उपाययोजना सुचवणे आणि आत्मविश्वास देणे हेच विद्यापीठाचे ध्येय आहे. आर्वी तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी अडचणी मांडल्या, रब्बी हंगामाकरिता तांत्रिक मार्गदर्शन मिळावे अपेक्षा व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.