Pune News: शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवभक्त येतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि किल्ल्यावरील सोहळा गडाखालील शिवभक्तांना पाहता यावा यासाठी विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन उभारा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या. .जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १२) आयोजित शिवनेरीवरील शिवजयंती सोहळा नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी, जुन्नरचे तहसीलदार, सोहळ्याशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते..Collector Jitendra Dudi: नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवा.जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत ग्रामविकास विभागाने पथ दिव्यासाठीचे खांब उभारण्याकरिता पुरातत्व विभागाकडून डिझाइन मान्यता घेऊन तसा प्रस्ताव तत्काळ सादर करावा, याकरिता जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.’’.Collector Jitendra Dudi: प्रस्तावित कामे ३१ जुलैच्या आत सुरू करा : जिल्हाधिकारी.जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनावाहनतळापासून गडाच्या पायथ्यापर्यंत मोफत बस सेवा द्या.वन, पुरातत्व विभागामार्फत पुरेशा उजेडासाठी दिवे, संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था करावी.नगरपालिकेमार्फत पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, विद्युत रोषणाई, दिशादर्शक फलक व स्वच्छतेची व्यवस्था करावी.आरोग्य पथकासह रुग्णवाहिकांची व्यवस्था तैनात ठेवावी..आरोग्य बूथवर औषधे, ओआरएसची पाकिटे उपलब्ध ठेवावीत.परिवहन महामंडळाने आवश्यकतेनुसार अतिरिक्त बसेस द्यावेत.महिला व शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करावी.कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणासाठी गडाच्या पायथ्यापर्यंत मोठ्या आकाराचे एलईडी स्क्रीन उभारावेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.