Chhatrapati Sambhajinagar News: धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी फुलंब्री तालुक्यातील ३८ वर्षीय तरुणाने मंगळवारी (ता. ३०) मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या हृदयद्रावक घटनेमुळे समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे..जालना येथे सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने धनगर समाज बांधवांकडून आंदोलने केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव गोरक्ष येथील ३८ वर्षीय तरुण गोपीनाथ रघुनाथ दांगोडे यांनी सुसाईड नोटमध्ये ‘‘मुख्यमंत्री साहेब माझे बलिदान वाया जाऊ देऊ नका, धनगर समाजाला एसटीत आरक्षण द्या,’’ असे लिहून मंगळवारी रात्री आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्रीपासून त्यांचा शोध घेतला जात होता. परंतु बुधवारी (ता. १) पहाटे शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृत गोपीनाथ यांच्या पश्चात पत्नी व चार मुली असा परिवार आहे..Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी आणखी एक महत्वाचा पुरावा; देवी लसीकरण नोंदीचा वापर करण्याची शिंदे समितीची शिफारस.घटनेची माहिती मिळताच वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. शोकाकूल वातावरणात खामगाव गोरक्ष येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची वडोद बाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे..Farmer Death: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ.गेल्या काही दिवसांपासून जालना येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारकडून अद्याप ठोस भूमिका घेतली नसल्याने नाराज होऊन दांगोडे यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे..धनगर समाज बांधवांकडून निषेधया आत्महत्येनंतर संतप्त धनगर समाजबांधवांनी छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर उतरून खामगाव फाट्यावर रास्ता-रोको आंदोलन केले. घोषणाबाजी करत नागरिकांनी शासनाचा निषेध नोंदवला आणि तहसील व पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. या वेळी कैलास गायके, गोरख काटकर, माधव जाधव, योगेश खिल्लारे, दीपक ढेपले, कैलास ढेपले, एकनाथ काटकर, नवनाथ खिल्लारे, गोपीनाथ खिल्लारे, सुनील खिल्लारे, योगेश ढेपले, प्रकाश पायगव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.