मुंबईकरांसाठी महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता दस्त नोंदणी करता येणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती.Document Registration Mumbai: मुंबईकरांसाठी महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मुंबईतील कोणत्याही मुद्रांक कार्यालयात आता दस्त नोंदणी करु शकता येणार आहे. याबाबतची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. .क्षेत्रीय मर्यादेची अट रद्दमुंबई आणि मुंबई उपनगरातील नागरिक, व्यावसायिक आणि कंपनी मालक आता आपल्या क्षेत्रासह मुंबईतील कोणत्याही सहा मुद्रांक कार्यालयातही दस्त नोंदणी (Adjudication of Document) करू शकणार आहेत. ज्या भागातील रहिवासी अथवा व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत, तेथीलच मुद्रांक कार्यालयात नोंदणी करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे..आता मुंबई शहर आणि उपनगरातील नागरिक कोणत्याही मुद्रांक कार्यालयात जाऊन दस्त नोंदणी करु शकतील. याचाच अर्थ असा की, बोरिवली, कुर्ला, अंधेरी, मुंबई शहर तसेच ओल्ड कस्टम हाऊस जवळील प्रधान मुद्रांक कार्यालयातील मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी एक आणि दोन) या सहा कार्यालयांत मालमत्ता करार, भाडे करार, वारसा हक्कपत्र सोबतच अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रांची दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येईल. .Maharashtra Land Survey: सहा महिने वाट पाहावी लागणार नाही, आता जमीन मोजणी होणार ३० दिवसांत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.या निर्णयामुळे मुंबईकरांचा वेळ आणि धावपळ वाचणार आहे. ही निर्णय प्रक्रिया आणि कार्यालयीन कामकाज जलद होणार आहे. यासंदर्भातील शासन राजपत्र जारी करण्यात आले आहे..Maharashtra E-Bond: आता स्टॅम्प पेपरची गरज नाही, राज्यात आजपासून ई-बॉण्ड सुरु करण्याचा मुद्रांक विभागाचा निर्णय.३० दिवसांत होणार जमीन मोजणीयाआधी महसूल विभागाने जमीन मोजणी प्रकरणांचा ३० दिवसांत निपटारा करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पोटहिस्सा, हद्द कायम, बिगरशेती, गुंठेवारी, संयुक्त भूसंपादन मोजणी, वनहक्क दावे मोजणी, नगर भूमापन मोजणी, गावठाण भूमापन मोजणी आणि सिमांकन आणि मालकीहक्कासाठी अत्यावश्यक असणारी मोजणी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होईल. त्याचबरोबर जमीन मोजणीसाठी परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करण्याचा निर्णयही घेतला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.