Khandesh News : शेतीसह जनआरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या येथील प्रस्तावित सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्प उभारणीबाबत शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी तीव्र हरकती नोंदवल्या. प्रकल्पासंदर्भातील सुनावणीसाठी बुधवारी (ता. २१) जिल्हा प्रशासनासह प्रदूषण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. त्या वेळी शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना निवेदन दिले..बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकाशा (ता. शहादा) येथील तळोदा चौफुलीजवळ सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्पासंदर्भात जनसुनावणी बुधवारी (ता. २१) झाली. शहाद्याचे प्रांत अधिकारी कृष्णकांत कनवारिया, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिक व धुळे येथील अधिकारी, प्रकाशा गावचे सरपंच राजनंदनी भील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, मंडल अधिकारी समाधान पाटील, ग्रामविकास अधिकारी बाळू पाटील,.Harnabari Project: हरणबारी मध्यम प्रकल्पातून रब्बी आवर्तनास सुरुवात.विकास संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, हरीभाई पाटील, जयगणेश पाटील, दिलीप चौधरी, प्रकाश ठाकरे, हितेंद्र चौधरी व विविध विभागातील अधिकारी, परिसरातील गावांतील तलाठी, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी, विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रस्तावित सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्पाच्या सुनावणीप्रसंगी विविध मान्यवरांनी आपले मत मांडले..गावाला हा प्रकल्प असल्यामुळे प्रदूषणाचा सातत्याने सामना करावा लागेल. तीर्थक्षेत्र असल्यामुळे दररोज हजारो भाविक येथे हजेरी लावतात. राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. प्रकल्पाला लागूनच हजारो हेक्टर शेत शिवार आहे. त्यामुळे शेती पिक नेहमी बाधित होण्याची शक्यता आहे. पिकांच्या पानांवर धुळ बसून प्रकाश संश्लेषण क्रिया बंद करू शकते. प्रकाशा, डामरखेडा, कोरीट, पिसावर, सावळदा, यावल, तऱ्हावद अशा २५ ते ३० खेड्यांचा दैनंदिन संपर्क येतो. .Temghar Project: टेमघर प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला मिळणार.देवापाट व लेंड्या नाल्यांसह तापी व गोमाई नद्या आहेत. लागूनच हॉटेल, रेस्टॉरंट असून अवघ्या एक किलोमीटरवर शाळा, विद्यालय, महाविद्यालय, नवीन मानवी वसाहती आहेत. या प्रकल्पामुळे सगळ्यांना बाधा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रक मंडळाकडून ना हरकत दाखला देऊ नये. दिल्यास तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देत प्रकल्प उभारणीस कायम विरोध दर्शवला. प्रकल्पामुळे संभाव्य समस्यांबाबत जय गणेश पाटील, विकास संस्थेचे माजी अध्यक्ष हरीभाई पाटील, नंदकिशोर पटेल आदींनी विचार मांडले..आरोग्याला धोकामहाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यांच्या सिमेरेषेवर वसलेले सुमारे २५ हजार लोक वस्तीचे प्रकाशा गाव आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. प्रकाशात तीर्थक्षेत्राला ‘ब’ दर्जा मिळाला आहे. प्रस्तावित सिमेंट प्रकल्प हा रेड झोनमध्ये येतो. शासनाच्या नियमातच हा प्रकल्प बसत नाही. तर सुनावणीपर्यंत हा विषय पोहोचलाच कसा, असा संतप्त सवाल करण्यात आला. सिमेंट प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात हवेत धूळ व वायू प्रदूषण होईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.