Sant Nyaneshwar Maharaj: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण २० जुलै रोजी माळशिरस तालुक्यातील पुरंदावडे येथे होणार आहे. या सोहळ्याची सर्व तयारी अंतिम टप्प्यात पोचल्याची माहिती सरपंच राणी मोहिते यांनी दिली..संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी १९ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानंतर २० जुलैला पुरंदावडे येथे पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने रिंगणासाठी मैदानाची तयारी वेगाने सुरू आहे. .Ashadhi Wari 2026: सोलापूर जिल्हा परिषदेकडून आषाढी वारीतील विकासकामांच्या निविदांना मंजुरी.रिंगणाच्या मैदानातील काटेरी झुडपे हटविण्यात आली असून, मैदानाचे मुरमीकरण सुरू आहे. रिंगणाची आखणी करण्यात आली असून, स्वागत कमानही उभारण्यात येणार आहे. याशिवाय गावातील सर्व रस्त्यांची स्वच्छता, काटेरी झुडपांची छाटणी, गटारींची साफसफाई तसेच औषध फवारणीची कामेही हाती घेण्यात आली आहेत..Ashadhi Wari 2026: संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान.या तयारीसाठी सरपंच राणी मोहिते, उपसरपंच देविदास ढोपे, ग्रामसेवक सचिन बनकर यांच्यासह पोपट गरगडे, विठ्ठल अर्जुन, संतोष शिंदे, प्रकाश कुंभार, हरी राऊत आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत..ओव्हरब्रीजमुळे सोहळा पाहणे अधिक सुलभरिंगणस्थळी पालखी मार्गावर ओव्हरब्रीज उपलब्ध असल्याने वारकरी व भाविकांना नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा सुरक्षितपणे आणि अधिक चांगल्या पद्धतीने पाहता येणारआहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.