Drought Challenges: दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र, सर्वजण आनंदात असताना नेहमीच दुर्लक्षित राहिलेला जगाचा पोशिंदा मात्र दिवाळीत दुष्काळाच्या सावटाखाली जगतो आहे. भात काढणीसह इतर कामातून घडणाऱ्या घामाच्या अभ्यंगस्नानातून शेतकरी कष्टाने धान्य पिकवीत आहे. सध्या मुळशीसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कुटुंबे भात काढणीच्या कामात व्यग्र आहेत..तालुक्यात ६५०० हेक्टरवर भात लावणी झाली आहे. आतापर्यंत २० ते ३० टक्के भात काढणी झाली आहे. माले, मुळशी खोऱ्यात भात काढणीला वेग आला आहे. मजुरांअभावी यंत्राच्या साहाय्याने भात काढणीला शेतकऱ्यांची पसंती आहे..Flowers Farmer Struggles: शेवंती उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर.जिल्ह्यातील मावळ, मुळशी व हवेली तालुके वगळता इतर दहा तालुक्यांत शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. ऑगस्ट महिन्यातच पावसाने दडी मारली. यामुळे बहुतांश ठिकाणी भात पीक पावसाअभावी डोळ्यादेखत करपून गेले..Farmer Struggles: महाग कृषी निविष्ठांमुळे केळी बागायतदार जेरीस.इतर पिकांच्या बाबतीतही खरीप हंगाम हातचा गेला व पुढील रब्बी हंगामातसुद्धा हातात काहीच येणार नाही, अशी गंभीर परिस्थिती जिल्ह्यात उद्भवली आहे..यंदा भात लागवड उशिरा झाली. पाऊस भात निसवण्याच्या काळात गेला. परिणामी पिकाचे उत्पादन कमी होणार आहे. या वर्षी घरी खायला पुरेसा तांदूळ होणेसुद्धा मुश्कील आहे. भात लागवडीसाठी झालेला खर्चसुद्धा निघणार नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती पाहता शासनाने दुष्काळी सवलती मुळशीत लागू कराव्यात.- पोपट दुडे, शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.