Dharashiv News: आधीच दर पडल्यामुळे अडचणीत आलेले राज्यातील बहुतांश सोयाबीन उत्पादक शेतकरी अतिवृष्टिमुळे झालेल्या पीक नुकसानीने पार कोलमडून गेले आहेत. दिवाळीचा सण तोंडावर असल्यामुळे बाजारात पडेल त्या किमतीत माल विकण्याशिवाय पर्याय नाही. बाजारात हमीभावाच्या तुलनेत क्विंटलमागे दीड हजार रुपयांचे सोसावे लागणारे नुकसान आणि उत्पन्नापेक्षा दीडपट वाढलेला खर्च यामुळे सोयाबीन शेती म्हणजे तोट्याचा खेळ ठरली आहे. .सोयाबीनचा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना सरासरी एकरी १० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अक्षरशः पाण्यात गेली आहे. सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी मिळाली तरच त्यांना सण साजरा करता येईल, अशी स्थिती आहे..सोयाबीनच्या काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. अतिवृष्टीच्या तडाख्यातून बचावलेल्या एकरभर रानात चार-पाच कट्टे म्हणजे दोन-अडीच क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती येऊ लागले आहे. त्यातून सात ते साडे सात हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. मात्र, एकरभर सोयाबीन पिकविण्यासाठीचा खर्चसुद्धा त्यातून निघत नाही. उलट शेतकऱ्यांना ५० ते ६० टक्के तोटाच होत आहे..Soybean Production Decline : सोयाबीन उत्पादनात १७ टक्के घट होणार.केंद्र सरकारने जाहीर केलेली सोयाबीनची किमान आधारभूत किंमत (हमीभाव) ५ हजार ३२८ रूपये क्विंटल आहे. सध्या बाजारात सोयाबीनला ४ हजार २०० रुपये दर आहे, परंतु आर्द्रतेचे (मॉईश्चर) प्रमाण जास्त असल्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ३ हजार ७०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे..सोयाबीन काढणीसाठी मजुरीचे दर प्रचंड वाढले आहेत. शेतीपेक्षा मजुरी केली असती तर बरे झाले असते, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेत धड पडीकही ठेवता येत नाही आणि पिकविले तर हाती काही लागत नाही, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे शासकीय मदत आणि पीकविमा भरपाईकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. ही मदत वेळेवर मिळाली नाही तर बहुतांशी शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारातच जाण्याची शक्यता आहे..Farmer Crisis Maharashtra : सांगा, कर्ज फेडायचे तरी कसे?.सोयाबीनचे गणित(शेतकरी कुटुंबाचे कष्ट वगळता)नांगरणी २००० रुपयेमोगडणी ९०० रुपयेबियाणे २५०० रुपयेखते १८०० रुपयेपेरणी ९०० रुपयेफवारणी २५०० रुपये.काढणी, वेचणी ६००० रुपयेभरडणी ६०० रुपयेतळवट आणि बारदाना १५०० रुपयेवाहतूक भाडे ५०० रुपयेएकूण खर्चएकरी १८ हजार ७०० रुपयेएकूण उत्पन्नएकरी ८५०० ते ९००० रुपयेएकरी सुमारे १० हजार रुपये तोटा.बाजार समितीत नव्या सोयाबीनची रोज सुमारे २० टनांची आवक होत आहे. प्रति क्विंटल ४ हजार २०० रुपये दर असला तरी सोयाबीनमध्ये आर्द्रता असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ३ हजार ७०० ते ४ हजार रुपयेच दर मिळत आहे.सूर्यकांत माने, सचिव, धाराशिव बाजार समिती.शेतात खळ्यावर तसेच शेतकऱ्यांच्या गावात जाऊन सोयाबीनची जागेवर खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वाहतूक भाडे वाचते. आर्द्रतेनुसार शेतकऱ्यांना जागेवर ३ हजार ७०० ते ४ हजार रुपये दर मिळत आहे.दत्तात्रेय कागदे, खासगी व्यापारी, दहिफळ, ता. कळंब.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.