Ilgrimage Infrastructure: पुणे विभागाच्या नूतन विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी गुरुवारी नातेपुते (ता. माळशिरस) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळाची पाहणी केली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पालखी महामार्ग व पालखी मुक्काम तळावरील सुविधांचा त्यांनी आढावा घेतला..यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, प्रांताधिकारी विजया पांगारकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमप, आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर, .Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी भाविकांची सुरक्षितता, स्वच्छता, सुविधा व्यवस्थेला प्राधान्य.पुरुषोत्तम पाटील, तहसीलदार सुरेश शेजुळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता सुनीता पाटील, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, मुख्याधिकारी विकास शिंगाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते..Ashadhi Wari 2026: तुकोबारायांच्या पालखीचे सात जुलैला प्रस्थान.पाहणीदरम्यान आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी पालखीतळावरील विविध समस्या, सुविधांतील त्रुटी आणि प्रलंबित प्रश्न विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी पालखीतळांशी संबंधित विविध मागण्याही करण्यात आल्या. विभागीय आयुक्त तेली यांनी स्वच्छता व्यवस्थेबाबत माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या..स्वच्छचागृह शुल्का बाबत तक्रारवारकऱ्यांच्या सुविधांसाठी पालखीतळांवर कोट्यवधी रुपये खर्च करून स्वच्छतागृह उभारली. मात्र, वारीच्या काळात काही ठिकाणी स्वच्छतागृह वापरासाठी वारकऱ्यांकडून शुल्क आकारले जात असल्याची तक्रार केली. पालखीतळांशी संबंधित काही प्रश्न प्रलंबित असून ते मार्गी लागतील, अशी अपेक्षा विश्वस्तांनी व्यक्त केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.