Social Forestry Department: सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कडेला हिरवाई फुलविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने २०१८ ते २०२४ या सात वर्षांच्या कालावधीत ३ लाख ९६ हजार ३३५ रोपांची लागवड केल्याची नोंद आहे. ही लागवड ७१४ किलोमीटर मार्गांवर आणि ३० हेक्टर सलग क्षेत्रावर करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात रस्त्यांवर झाडे अभावानेच दिसतात. झाडे जगली नसल्याने रस्ते ओसाडच असल्याचे वास्तव समोर येत आहे..अनेक ठिकाणी रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी जुन्या झाडांची तोड केली. त्यानंतर वृक्षलागवड करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर होती. सामाजिक वनीकरण विभागाकडूनही वृक्षलागवड करण्यात आली. मात्र अनेक मार्गांवर अपेक्षित प्रमाणात हिरवाई दिसत नाही..Tree Plantation Campaign: वृक्षारोपण व्यापक लोकचळवळ.सामाजिक वनीकरणने भंडीशेगाव (ता. पंढरपूर) आणि बोरगाव (ता. बार्शी) येथे प्रत्येकी १५ हेक्टर क्षेत्रावर सलग वृक्षलागवड केली आहे. तसेच मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध मार्गांवरही मोठ्या प्रमाणावर रोपे लावली. मात्र प्रत्यक्ष पाहणी केल्यास अनेक रस्त्यांवर झाडांची संख्या अत्यल्प असल्याचे दिसून येते..Tree Plantation: १९ हेक्टरवर ५७ लाख रोपणास ३.६९ कोटी होणार खर्च.वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, उन्हाळ्यातील पाण्याची कमतरता, रोपांच्या संरक्षणातील अडचणी आणि स्थानिक स्तरावरील सहकार्याचा अभाव यामुळे रोपे जगविण्याचे आव्हान निर्माण होते. मात्र सात वर्षांत जवळपास चार लाख रोपांची लागवड झाल्याच्या नोंदी आणि अनेक मार्गांवरील उजाड वास्तव यातील तफावत लक्षवेधी ठरत आहे..२०२४ मधील प्रमुख वृक्षलागवडसारोळे-कोन्हेरी (मोहोळ) : ३ किमी १,५०० रोपेसारोळे-हिवरे (मोहोळ) : ३ किमी, १,५०० रोपेसारोळे-चिखली (मोहोळ) : ३ किमी, १,५०० रोपेरानमसले-नान्नज (उ. सोलापूर) : २ किमी, १,००० रोपेसाखरेवाडी-कळमण (उ. सोलापूर) : २ किमी, १,००० रोपेकळमण-कौठळी (उ. सोलापूर) : २ किमी, १,००० रोपे.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.