Pune News: पुरंदर तालुक्यातील दिवे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘लोकनेते दादासाहेब जाधवराव फळे बाजार’ मंगळवारी (ता. २६) सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. .या बाजारात शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. बाजाराचे संकल्पक भाजपचे पुरंदर-हवेली विधानसभा निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते प्रारंभ झाला आणि पहिल्याच दिवशी याला शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला..Fruit Market : बाजारपेठेसाठी फळांचा दर्जा हा महत्त्वाचा घटक .बाजाराच्या उद्घाटनप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या संगीता काळे, सरपंच रूपेश राऊत, माजी सरपंच गुलाबराव झेंडे, अमित झेंडे, बापू टिळेकर, उत्तम झेंडे, गणपत शितकल, बाळासाहेब झेंडे, राजेंद्र काळे, दिलीप झेंडे, बापू जगताप, अमर झेंडे, शरद झेंडे, सुजाता जगदाळे, श्रद्धा काळे, पुनम झेंडे, सुरेश झेंडे, पोपट झेंडे, समीर झेंडे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते..Fruit Market : अमरावती बाजारात कलिंगडाची २५० क्विंटल आवक.सर्व सुविधा उपलब्धदिवे बाजारात सुमारे ४५ ते ५० स्थानिक आणि बाहेरील व्यापारी उपस्थित होते. व्यापाऱ्यांना ग्रामपंचायतीने सुमारे ५००० चौरस फूट जागेतील इमारत उपलब्ध करून दिली आहे. तसेच स्वच्छतागृहांची दुरुस्तीही लवकरच करण्यात येणार असल्याचे माजी सरपंच गुलाबराव झेंडे यांनी सांगितले. यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत..पहिल्याच दिवशी मिळाला चांगला दरनवीन फळ बाजाराला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. सीताफळ, डाळिंब, पेरू आणि अंजीर यांसारख्या फळांची मोठी आवक झाली. एकूण ५५० क्रेट सीताफळ, २०० क्रेट डाळिंब, १५० क्रेट पेरू आणि ७० टब अंजीर बाजारात दाखल झाले. व्यापारी युवराज जाधवराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या फळांना चांगला बाजारभाव मिळाला. सीताफळाला प्रति क्रेट ५०० ते ४५०० रुपये, डाळिंबाला ३००० ते ४००० रुपये, पेरुला १२०० ते १५०० रुपये आणि अंजिराला प्रति टब ६०० ते ७०० रुपये बाजारभाव मिळाला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.