News: ‘डिटवाह’ चक्रीवादळाने श्रीलंकेमध्ये मोठे नुकसान झाले असून, चक्रीवादळ आणि पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या १९३ वर पोहोचली असून, २२८ जण बेपत्ता आहेत. .भारताने श्रीलंकेला मदत देऊ केली असून, रविवारी विविध भागात मदतकार्य सुरू होते. चक्रीवादळामुळे ९,६८,३०४ नागरिक आणि २,६६,११४ कुटुंबे प्रभावित झाली आहेत, असे आपत्ती व्यवस्थापन केंद्राने सांगितले..Cyclone Ditvah: ‘डिटवाह’ चक्रीवादळामुळे पूर्व किनाऱ्याला इशारा.‘‘भारताच्या आपत्ती निवारण दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या आणि भारतीय हवाई दल श्रीलंकेतील अधिकाऱ्यांना नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी युद्धपातळीवर मदत करत आहेत. ‘एनडीआरएफ’च्या तुकड्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या समन्वयाने श्रीलंकेत मदतकार्य सुरू ठेव आहे,’’ असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी म्हटले आहे..भारताने ‘ऑपरेशन सागर बंधू’अंतर्गत ८० जवानांचा समावेश असलेल्या दोन शोध व बचाव पथके श्रीलंकेत पाठवली. ‘आयएनएस विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेवरील दोन चेतक हेलिकॉप्टर देखील बचाव कार्यात सहभागी झाले आहेत..Cyclone Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; महाराष्ट्रावर परिणाम काय?.छतावर अडकलेल्या एका कुटुंबातील चार जणांना चेतक हेलिकॉप्टरच्या साह्यातून वाचविण्यात आले. ‘ऑपरेशन सागर बंधू’ सुरू असून, भारत श्रीलंकेच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे, असे भारतीय उच्चायुक्तालयाने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे..भारतीय हवाई दलाने कोलंबोमध्ये ‘एम आय-१७’ हेलिकॉप्टर तैनात केले असून, भारतीय सैन्यदले नागरिकांच्या स्थलांतरासाठी सज्ज आहेत. तिरुअनंतपुरम व हिंडनहून अनेक मोहिमा नियोजित करण्यात आल्या आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.