Banking Sector : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस २०२५-२६ या आर्थिक वर्षात करपूर्व ढोबळ नफा २०१ कोटी २३ लाख, तर सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा १२२ कोटी ९८ लाख इतका झाला आहे. बॅंकेने मार्चअखेर १२ हजार ८७० कोटी इतक्या ठेवींची मजल गाठली आहे. .बँकेची कर्जवसुली विक्रमी असून, निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के आहे. या नफ्यातून बँकेने कर्जदार शेतकरी सभासद, विकास सेवा सोसायट्या, सचिव आदींसाठी भरीव तरतूद केलेली आहे, अशी माहिती बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन जाधव पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी दिली आहे..Beed District Bank: बीड जिल्हा बँकेसाठी मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार.जिल्हा बॅंकेची ७६ वी वार्षिक साधारण सभा शनिवारी (ता. २९) दुपारी एक वाजता बँकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे. या पार्श्वभूमीवर बॅंकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांनी नफ्याचा आढावा मांडला आहे..Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व.बॅंकेबद्दल जनतेमध्ये असलेली प्रचंड विश्वासार्हता व बँकेची उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बॅंकेच्या ठेवींत भरघोस वाढ झाली आहे. बँकेने मार्च २०२६ अखेर १२ हजार ८७० कोटी इतक्या ठेवींची मजल गाठली आहे. बँकेची कर्जवसुली विक्रमी असून, निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के आहे. .अहवाल सालात झालेल्या नफ्यातून बँकेने कर्जदार शेतकरी सभासद, विकास सेवा सोसायट्या, सचिव आदींसाठी भरीव तरतूद केलेली आहे. सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन जाधव पाटील, उपाध्यक्ष देसाई व डॉ. सरकाळे यांनी केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.