Nashik News : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण घोषित झाल्यावर जिल्ह्यातील पंधराही पंचायत समित्यांमधील सभापतिपदासाठी सोडत काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (ता. २९) सकाळी अकराला सोडतीची प्रक्रिया पार पडेल. या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. .राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके उडणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेतल्या जातील, असा अंदाज आहे. त्यामुळे प्रशासन कामाला लागले. .Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुहूर्त जानेवारीत? तीन टप्प्यात मतदान होण्याची शक्यता.गट-गण अंतिम केल्यावर शासनाने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण काढले. त्यात नाशिकचे पद हे सर्वसाधारणसाठी सुटले आहे. त्यानंतर जिल्ह्यातील पंधराही पंचायत समित्यांत सभापतिपदाच्या सोडतीकडे राजकीय पक्ष व इच्छुकांचे लक्ष लागून राहिले..जिल्हाधिकारी शर्मा यांनी ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार सोमवारी सभापतिपदाची सोडत बोलविली आहे. या प्रक्रियेसाठी ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागसवर्गाचा प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) व महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती यातील महिलांसह) यांच्यासाठी राखून ठेवायच्या आहेत. त्यानुसार सभापतिपदाची संख्या निश्चित करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली..Maharashtra Local Body Elections : दिवाळीनंतर धुरळा! ३२ जिल्हा परिषद, ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट.चार पदे राखीवअंशतः अनुसूचित क्षेत्रातील; पण अनुसूचित जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, अशा पंचायत समितीत पांचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यात अनुसूचित जमातीसाठी चार पंचायत समित्यांचा समावेश असून, त्यातील दोन महिलांसाठी राखीव असतील. दिंडोरीचे पद हे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव असणार आहे..अशी असेल पदांची निश्चितीअनुसूचित जाती..०१ (महिला राखीव)अनुसूचित जमाती...०३ (महिलेसाठी एक राखीव)नागरिकांचा मागास प्रवर्ग... ०४ (महिलांसाठी दोन राखीव)सर्वसाधारण....०२ (महिलेसाठी एक राखीव).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.