Latur News : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेल्या नुकसान भरपाईसाठी प्राप्त झालेल्या २४४ कोटी रुपये मदतीचे वितरण तातडीने होणे आवश्यक आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास गती द्यावी. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांनी संवेदनशील राहून पंचनामे करावेत. .एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी रविवारी (ता. २८) जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेताना केली..अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, अहिल्या गाठाळ, गणेश पवार, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे, महापालिका उपायुक्त पंजाब खानसोळे, नगर प्रशासनाचे सहआयुक्त अतुल डोके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी या वेळी उपस्थित हगोते. उपविभागीय अधिकारी शरद झाडके, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे व मंजुषा लटपटे यांच्यासह सर्व तहसीलदार दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. .Crop Damage : अमरावतीत दोन लाख हेक्टरवर नुकसान.पुराच्या पाण्यामुळे शेती, घराचे नुकसान, पशुधनाची हानी आदी सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. गावांमध्ये, घरांमध्ये पुराचे पाणी गेले आहे, अशा ठिकाणी साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घ्यावी. आवश्यक ठिकाणी औषधी कीटचे वाटप करावे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होवू नयेत, याची काळजी घ्यावी. स्रोत दुषित झाले असतील, तिथे पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी. .सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी आरोग्य, भोजन आदी सुविधा चोखपणे पुरवाव्यात, चारा वाहून गेलेल्या ठिकाणी पशुपालकांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आदी सूचनाही जिल्हाधिकारी ठाकूर यांनी दिल्या. .Rain Crop Damage : साताऱ्यात अतिवृष्टीचा साडेसहाशे हेक्टरला फटका.पावसाचे व पुराचे प्रमाण कमी झालेल्या ठिकाणी नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत. अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसानीचे पंचनामे करणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहू नये, याबाबत खबरदारी घ्यावी. तसेच ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर वितरित होण्यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार स्तरावर मिशन मोडवर कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी ठाकूर यांनी सांगितले..जिल्ह्यात मदतीचे वाटप सुरूऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईपोटी तीन लाख ८० हजार ५११ शेतकऱ्यांना २४४ कोटी मंजूर झाले असून त्याचे वाटप करण्यात येत आहे. यासोबत जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मयत सहा व्यक्तींच्या वारसांना रुपये चोवीस लाख मदतीचे वाटप करण्यात आले. पुरामुळे व वीज पडून मयत झालेल्या १६२ जनावरांच्या पशुपालकांना मदतीचे वाटप करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.