Nanded News : पीक कापणी प्रयोगाच्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी कृषी, महसूल व ग्रामविकास (जिल्हा परिषद) विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांची आढावा बैठक घेण्यात आली. खरीप हंगाम वर्ष २०२५-२६ साठी सर्व संबंधीतांना पीक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे..यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगांना आधारभूत धरण्यात येणार आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोगात कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. पीक कापणी प्लॉटची आखणी, कापूस पिकांबाबत आवश्यक वेचनी, भात, सोयाबीन, ज्वार, तूर इत्यादींबाबत सुकविण्याचे प्रयोग, उत्पादन मोजणी तंत्र तसेच प्रयोगाची आवश्यक छायाचित्रे, नोंदी संकलित कराव्यात..Crop Cutting Experiment: पीककापणी प्रयोगात मोईश्चर मीटरचा वापर बंधनकारक करावा.सर्व प्रयोग शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसारच पार पडतील याबाबत सर्व संबंधीतांनी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पीक विम्यासाठी तसेच पीकांचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अन्यन्य साधारण महत्व असल्याने सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या गावातील सर्व प्रयोग सीसीई पवर अचूकपणे पार नोंदवले जातील यासाठी आवश्यक दक्षता घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. .Crop Cutting Experiment : धाराशिवला मुग, उडीदाचे पीक कापणी प्रयोग.जिल्हयात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर पिकांचे कापणी प्रयोग शिल्लक आहेत. या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तप्रसाद कळसाईत, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसिलदार विपीन पाटील, तंत्र अधिकारी गोविंद देशमूख, सुप्रिया वायवळ यांचेसह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते..३३१२ कापणी प्रयोगांचे नियोजनजिल्हाभरात ५५८ गावांत एकूण ३३१२ कापणी प्रयोगांचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामस्तरीय समिती, क्षेत्रीय अधिकारी, पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याच गावातील प्रगतीशील शेतकरी, पोलिस पाटील व ग्रामपंचायत निर्देशीत सदस्य यांनी देखील अचूक निष्कर्ष नोंदवले जातील यासाठी नियोजीत कापणी प्रयोगास वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.