Parbhani News: तुषार संच विक्रीत अनियमितता आढळून आल्यामुळे गंगाखेड येथील संबंधित वितरकाची नोंदणी रद्द करण्यासाठी कृषी आयुक्तलयाकडे शिफारस केली आहे. याप्रकरणी आलेल्या तक्रारीची तत्काळ दखळ घेऊन कृषी विभागाने ही कारवाई केली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी दिली..गंगाखेड येथील साई इरिगेशन या नावाचे फिनोलेक्स प्लॉसॉन या कंपनीचे ठिंबक व तुषार संच विक्रीचे अधिकृत वितरक आहेत. या विक्रेत्याच्या साहित्य पुरवठा व विक्री पश्चात सेवेमध्ये अनियमितता असल्याबाबत गंगाखेड-१ येथील उप कृषी अधिकारी यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. .Parbhani ZP : पाणी व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे तुषार सिंचन संच वाटप.या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कृषी उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना केली. या समितीने प्रत्यक्ष साई इरिगेशन, गंगाखेड यांच्या दुकानामध्ये प्रत्यक्ष तपासणी केली. त्या वेळी प्रो.प्रा. भाऊसाहेब काळे व्यक्तिशः उपस्थित होते. या वितरकाने पडेगाव (ता. गंगाखेड) येथील शेतकरी विठ्ठल बापूराव जाधव यांना कंपनीने शासनास सादर केलेल्या दरापेक्षा जास्तीच्या दराने तुषार संच विक्री केला. .त्यांनी त्यांच्या बिलाची नोंद साठा रजिस्टर व विक्री रजिस्टर विक्रीमध्ये केल्याचे दिसून आले. परंतु या वितरकाने फिनोलेक्स प्लॉसॉन कंपनीच्या तुषार सिंचन संचाचा साठा शिल्लक नसतानाही परभणी येथील अजय एन्टरप्रायजेस नामे अन्य वितरकाकडून तुषार सिंचन संच आणून संबंधित शेतकऱ्यास विक्री केल्याचे दिसून आले. परंतु या संचाची नोंद विक्रीसाठा नोंदवहीत घेतली गेल्याचे दिसून आले नाही..irrigation Scheme Fraud : सूक्ष्मसिंचन संच गैरव्यवहार प्रकरणातील ‘त्या’ अकरा जणांचा निलंबन प्रस्ताव नाही .विठ्ठल जाधव यांच्या पडेगाव येथील शेतात समितीने प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली असता संबंधित शेतकऱ्याकडे जुना तुषार संच असल्याचे आढळून आले. नियमानुसार तुषार सिंचन संचाच्या एच.डी.पी.ई. पाइपवर बॅच क्रमांक असणे व पाइपवर शेतकऱ्याचे नाव, गाव, योजना, वर्ष आदी एम्बॉसिंगद्वारे वितरकाकडून शेतकऱ्यास मोफत करून देणे आवश्यक आहे. परंतु शासन निर्णयाचा वितरकाने भंग केल्याचे दिसून आले..अशा घटनांमुळे भविष्यात संचामध्ये काही बिघाड झाल्यास, विक्री पश्चात सेवा मिळवण्यात अडचण निर्माण होऊ शकते. अशा घटना वारंवार होऊ नयेत. इतर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाने धडक कार्यवाही केली. या वितरकाची नोंदणी रद्द करण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कृषी आयुक्तालयाकडे शिफारस केली..या वितरकाची बँक गॅरंटी जप्त केली आहे. याबाबत शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत. चौकशी समितीत कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी, गंगाखेड येथील तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, तंत्र सहायक यांचा समावेश होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.