Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान झालेल्या पैकी ४.६० लाख शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. .माहितीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत शेती पीक नुकसानीच्या अनुषंगाने वेळोवेळी बाधित शेतकऱ्यांचे कृषी व महसूल विभाग यांच्यामार्फत संयुक्त पंचनामे करून बाधितांच्या याद्या करण्यात आल्या. वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत विभागीय आयुक्त यांच्यामार्फत शासनास अहवाल सादर करुन निधी मागणी करण्यात आली. त्या मागणीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी शासनाने २० ऑक्टोबर व २९ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार निधी मंजूर केला. .Farmer Relief Fund: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४४ हजार कोटींचे पॅकेज दिले: अजित पवार.निधी मंजूर झाल्यानंतर लगेच सर्व संबंधित तहसीलदार यांच्या मार्फत तालुकानिहाय बाधित शेतकरी यांच्या याद्या ऑनलाइन पोर्टवर अपलोड करण्यात आल्या. त्यांनतर शेतक-यांचा अॅग्रीस्टॅक/फॉर्मर आयडी काढलेल्या बाधित शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानीचे अनुदान त्यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले. शासनाने ४ नोव्हेबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार खरडून गेलेल्या जमिनीसाठी रक्कम रुपये ६ कोटी ७० लाख ६० हजार निधी मंजूर केला आहे. तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर आनुषंगिक बाबीकरीता प्रति हेक्टर रक्कम रुपये १० हजार (३ हेक्टरच्या मर्यादेत) निधी उपलब्ध करून देवून मंजूर केला आहे..Farmer Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३५० कोटींची मदत.शेतकरी संख्या व मदतछत्रपती संभाजीनगर जिल्हयात ० ते २ हेक्टरपर्यंत नुकसान झालेले एकूण शेतकरी संख्या ६ लाख ४४ हजार ६४९ व २ ते ३ हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ४१ हजार १३९ आहे. त्यापैकी ५ लाख ७ हजार ७८० इतक्या बाधित शेतकरी यांच्या याद्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. अर्थात १ लाख ७८ हजार ८ बधितांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करणे बाकी आहे. याद्या अपलोड केलेल्यांपैकी ज्या शेतकऱ्यांच्या अॅग्रीस्टॅक/फॉर्मर आयडी काढलेला आहे, अशा एकूण ४ लाख ६० हजार ८४० शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे..४६ हजार शेतकऱ्यांचे अनुदान ई-केवायसी अभावी रखडलेउर्वरित ४६ हजार ९४० शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक/फॉर्मर आयडी काढलेले नसल्यामुळे त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. ज्या शेतकऱ्यांचे अॅग्रीस्टॅक/फॉर्मर आयडी काढलेले नाही अशा शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांच्या बॅंक खात्यामध्ये त्यांचे अनुदान जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे..तपशील शेतकऱ्यांची संख्याएकूण नुकसान झालेले शेतकरी (० ते ३ हेक्टर) ६,८५,७८८ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केलेल्या याद्या ५,०७,७८०पोर्टलवर अपलोड करणे बाकी १,७८,००८खात्यात अनुदान जमा झालेले शेतकरी (अॅग्रीस्टॅक/फॉर्मर आयडी काढलेले) ४,६०,८४०ई-केवायसी अभावी प्रलंबित ४६ हजार ९४० शेतकरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.