Agriculture Scheme News: नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) दोन दिवसीय बैठकीला सोमवारी (ता. १३) सुरुवात झाली. बैठकीच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांच्या योजनांसह विशेषतः कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला..समितीचे अध्यक्ष खासदार राजाभाऊ वाजे आणि समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, महापौर हिमगौरी आडके, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक महेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते..Agriculture Infrastructure Fund Scheme: ‘कृषी पायाभूत सुविधा निधी’ योजनेत महिलांना प्राधान्य; लाभ घेण्याचे आवाहन.बैठकीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध महत्त्वाच्या कृषी योजनांच्या भौतिक आणि आर्थिक प्रगतीची माहिती सादर करण्यात आली. जिल्ह्यातील प्रत्येक गावातून पीकनिहाय मातीचे नमुने घेऊन पीक सुधारणेसाठी त्यांचे योग्य परीक्षण करावे. तसेच शेतकऱ्यांना रासायनिक खतांऐवजी जैविक आणि सेंद्रिय खतांच्या वापरासाठी जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना करण्यात आल्या..‘ई-राष्ट्रीय कृषी बाजार’ (ई-नाम) योजनेचा लाभ स्थानिक बाजार समित्या आणि शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळावा, यासाठी व्यापक जनजागृती करावी. ‘आत्मा’अंतर्गत शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या परदेश अभ्यास दौऱ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रयोगशील आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश करावा, असे निर्देश देण्यात आले.कृषी योजनां.Sandalwood Farming: चंदन शेती : गैरसमज, वास्तव आणि तंत्रज्ञानाची नवी दिशा.याशिवाय राष्ट्रीय कृषी विकास योजना, परंपरागत कृषी विकास योजना, मृदा आरोग्य पत्रिका, पंतप्रधान पीकविमा योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, कृषी क्लिनिक व कृषी व्यवसाय केंद्र योजना, किसान कॉल सेंटर, पंतप्रधान कृषी सिंचन योजना आणि पीएम-किसान या योजनांच्या सद्यःस्थितीचाही आढावा घेण्यात आला..बैठकीत प्रत्येक विभागाकडून योजनांवरील खर्च, निधीची स्थिती, लाभार्थ्यांची संख्या आणि अंमलबजावणीतील अडचणी जाणून घेण्यात आल्या. केंद्र शासनाच्या योजनांची प्रभावी, पारदर्शक आणि कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश खासदार वाजे आणि जिल्हाधिकारी प्रसाद यांनी संबंधित विभागांना दिले. खासदार डॉ. बच्छाव आणि खासदार भगरे यांनीही शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने विविध सूचना मांडल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.