Jalgaon News: लिंबूवर्गीय फळ पिकांत भारतात उत्पादकता परदेशातील उत्पादकतेच्या तुलनेत कमी आहे. यासंबंधी देशात अनेक चांगले संशोधक, संस्था काम करीत आहेत. पण रोग नियंत्रणासाठी रोगमुक्त रोपे, चाचण्यांवर कटाक्ष व त्यातील निष्कर्ष यासंबंधी जाणीवपूर्वक काम केल्यास चांगले परिणाम दिसून येतील, असे मत कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. चंद्रिका रामाडुगू यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना व्यक्त केले. .डॉ. रामाडुगू यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठांतर्गत लिंबूवर्गीय पिकातील सिट्रस ग्रीनिंग या रोगासंबंधी १५ वर्षे काम केले आहे. त्यांनी जैन हिल्स येथे आयोजित लिंबूवर्गीय फळ पीक परिषदेत सहभाग घेतला आहे..त्या म्हणाल्या, ‘‘लिंबूवर्गीय फळ पिके जगात महत्त्वाची आहेत. भारतातही त्यावर चांगले काम सुरू आहे. या परिषदेतून त्यासंबंधी विविध शोधप्रबंध, संशोधन पेपर पाहिले, ते अभ्यासले. अनेक शास्त्रज्ञांनी ठोस बाबी रोगनियंत्रण आणि उत्पादनवाढीसाठी सांगितल्या. या शिफारसी चांगल्या आहेत.’’.Citrus Farming Innovation: लिंबूवर्गीय पिकांत मूल्यवर्धन हवे.कडक नियमांचे पालन व्हावे‘‘सिट्रस ग्रीनिंग या रोगाने अमेरिकेतील शेतकरी चिंतेमध्ये आहेत. या रोगाची विविध लक्षणे आहेत. हा रोग भारतातही आहे. त्यावर शास्त्रज्ञ आपापल्या परीने, भौगोलिक स्थिती, वाण, वातावरण यानुसार काम करीत आहेत. हा रोग आटोक्यात आणण्याची गरज आहे. त्यासाठी काही प्रमुख बाबींचे अनुकरण, पालन करावे लागेल..त्यात प्रथम रोपवाटिकांमध्ये रोगमुक्त रोपे तयार व्हावीत, तंत्रशुद्ध रोपवाटिका आवश्यक आहेत. त्यात जे साहित्य वापरले जाते ते शुद्ध, व्यवस्थित हवे. चाचण्या व त्यावरील निष्कर्ष व उपचार, कार्यवाही हे सूत्र आवश्यक आहे. अमेरिकेत रोपवाटिकांसाठी कडक नियम आहेत..Citrus Processing Plant: लिंबूवर्गीय फळे उत्पादनासह प्रक्रिया महत्त्वाची .रोपवाटिकांतील साहित्य तंत्रशुद्ध, शुद्ध असते. रोगमुक्त रोपे आहेत की नाहीत याची तपासणी करणारी प्रणाली, स्वतंत्र यंत्रणा आहे. रोपवाटिका १०० टक्के क्रॉप कव्हरने झाकलेल्या असतात. अशीच कार्यवाही भारतातही व्हायला हवी. त्याशिवाय रोगमुक्त रोपे तयार होऊन ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाहीत,’’ असे त्यांनी सांगितले..भारतात लिंबूवर्गीय पिकांची उत्पादकता अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे. भारत या पिकात सध्या मोठे काम करीत आहे. पण उत्पादन व उत्पादकता यासाठी शास्त्रज्ञ, शेतकरी व संस्था या सर्वांचा पुढाकार, एक कार्यक्रम आवश्यकत असतो. त्यामुळे चांगले परिणाम दिसून येतात, असेही त्या या वेळी म्हणाल्या..अमेरिकेत सिट्रस ग्रीनिंग आता नियंत्रणातअमेरिकेत फ्लोरीडा भागात २००५ पर्यंत सिट्रस ग्रीनिंग या रोगाने लिंबूवर्गीय पिकांमध्ये मोठे नुकसान झाले होते. रोगाचा प्रादुर्भाव अधिक होता. पण त्याला आटोक्यात आणण्यासाठी शास्त्रज्ञ, शेतकरी व संस्थांनी एकत्रित कार्यक्रम हाती घेतला. काही नियम तयार केले. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. आजच्याघडीला तेथे सिट्रस ग्रीनिंग हा रोग पाच टक्के एवढाच दिसतो. यामुळे उत्पादकता वाढली, उत्पन्नही वाढले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.