Lemon Orchard: फळबागांची नवीन लागवड करताना उत्तम निचऱ्याची जमीन, सुधारित वाणांचा वापर तसेच शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून दर्जेदार व रोगमुक्त रोपे घ्यावीत. लागवडीसाठी निवडण्यात येणाऱ्या रोपांची योग्य उंची, वय, कलमाची गुणवत्ता आणि सक्षम मूल्यव्यवस्था आवश्यक असल्याचा सल्ला स्थानिक कृषी विज्ञान केंद्राचे उद्यान विद्या तज्ज्ञ गजानन तुपकर यांनी दिला. .स्थानिक कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन लिंबू लागवड व हस्त बहर व्यवस्थापन तंत्र या विषयावर एकदिवसीय तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते..Lemon Orchard Cultivation : लिंबाला चांगला भाव मिळण्यासाठी असं नियोजन करा.प्रशिक्षणादरम्यान तुपकर यांनी लिंबू पिकाच्या शास्त्रोक्त लागवड तंत्रज्ञानापासून ते हस्त बहार व्यवस्थापनापर्यंत विविध महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की लागवडीपूर्वी खड्डा पद्धती अथवा गादीवाफ्यावर लागवड या दोन्ही पद्धतींचे तांत्रिक फायदे स्पष्ट करताना जमिनीच्या प्रकारानुसार योग्य पद्धतीची निवड करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. खड्डे भरताना शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट, जैविक खते, ट्रायकोडर्मा तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. लागवडीनंतरच्या पहिल्या पाच वर्षांत बागेचे छाटणी व्यवस्थापन, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचन, अन्नद्रव्यांचे टप्प्याटप्प्याने नियोजन आणि रोग-किडींपासून संरक्षण या बाबतही त्यांनी तांत्रिक माहिती दिली..Turmeric Cultivation: हळद लागवडीसाठी जमिनीची पूर्वतयारी कशी करावी?.या वेळी शेतकऱ्यांनी लिंबू पिकातील फळगळ, डिंक्या रोग, कोळशी, पानगळ, फुलगळ, अन्नद्रव्य कमतरता, पाणी ताण व्यवस्थापन तसेच बाजारपेठेतील चढ-उतार या संदर्भातील विविध समस्या मांडल्या. त्यांच्या प्रश्नांचे तांत्रिकदृष्ट्या शास्त्रोक्त निरसन करण्यात आले. डॉ. गोपाल मंजुळकर यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणारे विविध तंत्रज्ञान प्रसार उपक्रम, शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, कृषी सल्ला सेवा तसेच फलोत्पादन विषयक योजनांची माहिती उपस्थितांना दिली. या प्रशिक्षणामुळे लिंबू आधुनिक लागवड तंत्रज्ञान, हस्त बहार व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक शास्त्रीय बाबींची सखोल माहिती मिळाल्याची भावना उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली..किडी आणि रोगांचे एकात्मिक व्यवस्थापनहस्त बहर व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले, पाच वर्षांपुढील उत्पादनक्षम बागांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने हस्त बहर घेतल्यास दर्जेदार व बाजारपेठाभिमुख उत्पादन मिळू शकते. फुलांच्या निर्मितीपासून ते फळ तोडणीपर्यंत संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता तसेच किडी आणि रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन या बाबींवर त्यांनी सखोल माहिती तज्ज्ञ गजानन तुपकर यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.