Pune News: पुणे विभागात खरिपात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. उगवून आलेली पिके वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र अनेक ठिकाणी पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांना नियंत्रणासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे हंगामात पुरेसे उत्पन्न न मिळाल्यास शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे..विभागात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत जोरदार पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी पिकांच्या पेरण्या वेळेवर झाल्या असून, काही ठिकाणी वाफसा न मिळाल्याने उशिराने पेरण्या केल्या आहेत. प्रामुख्याने भात लागवडी अनेक ठिकाणी उशिराने झाल्या आहेत..Moong Crop Disease: मुगावरील लिफ क्रिंकल रोगाचे व्यवस्थापन.आतापर्यंत विभागात सरासरीच्या १२ लाख ५६ हजार ४३९ हेक्टरपैकी १३ लाख ७० हजार ९३९ हेक्टर म्हणजेच १०९ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. मूग व उडीद पिके शेगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. याच काळात रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. शेतकरी चांगलाच मेटाकुटीस येऊ लागला आहे..सध्या अहिल्यानगरमधील पाथर्डी, राहुरी तालुक्यांत कापूस पिकावर मावा व तुडतुडे या किडीचा प्रार्दुभाव आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ गेलेला दिसत आहे. शेवगाव तालुक्यात कापूस पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेला दिसत आहे. नेवासा तालुक्यात कापूस पिकावर अल्प प्रमाणात लाल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. मका लष्करी अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेला दिसत असून इतर तालुक्यांत प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा कमी आहे. सोयाबीन उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे..Kharif Crop Loss : पावसाचा खंड; खरीप पेरा अडचणीत.जिल्ह्यात मका पिकावर तुरळक प्रमाणात लष्करी अळी तर सोयाबीन पिकांवर पाने खाणाऱ्या अळीचा व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोलापूरमध्येही सोयाबीन, मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव आहे. पीक संरक्षणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन संबंधी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे..तूर, मूग, उडीद अशी विविध पिके आमच्या भागात शेतकऱ्यांनी घेतली आहे. या पिकांवर कमीअधिक प्रमाणात रोग, किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.भाऊसाहेब पळसकर, शेतकरी, कर्डे, ता. शिरूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.