Gadchiroli News: खरीप हंगाम २०२५ मध्ये खतांची टंचाई भासू नये, यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने ठोस पावले उचलली आहेत. तेलंगणा राज्यातील रामागुंडम येथील नॅशनल फर्टिलायझर्स लि. कारखान्यातून गडचिरोली जिल्ह्यासाठी युरियाचा पुरवठा थेट रस्ते मार्गाने सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऐन हंगामात वेळेत व योग्य दरात खत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला..आतापर्यंत युरियाचा पुरवठा प्रामुख्याने रेल्वे रेकद्वारे होत असल्याने अनेकदा विलंब होत होता. गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा) हे एकमेव रेक केंद्र असून, सध्या देसाईगंज व चंद्रपूर या दोन ठिकाणांवरून खतपुरवठा केला जातो. मात्र सिरोंचा, अहेरी, भामरागड व एटापल्लीसारख्या दुर्गम तालुक्यांमध्ये रेक केंद्रांपासूनचे अंतर अधिक असल्याने वाहतूक खर्च वाढत होता आणि वेळेवर खत पोहोचत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने मागील काही वर्षांपासून रामागुंडम (तेलंगणा) येथील एनएफएल कारखान्यातून थेट ट्रकद्वारे युरिया पुरवठा सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता..Urea Supply: राज्यात युरियाचा पुरवठा तातडीने करा: कृषिमंत्र्यांकडून केंद्राला पत्र. अखेर या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १०० टन युरिया या आठवड्यात अहेरी येथे दाखल होणार आहे. धानाचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणावर धानाची रोवणी एकाच वेळी होते. याच कालावधीत युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. थेट रस्ते मार्गाने पुरवठा सुरू झाल्यामुळे दुकाने, सेवा सहकारी संस्था व विक्री केंद्रांमध्ये युरिया सहज उपलब्ध होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला..Urea Import: भारताची युरिया आयात दुपटीहून अधिक.खतांचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यास चढ्या दराने विक्री, कृत्रिम टंचाई व काळाबाजाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कृषी विकास अधिकारी किरण खोमणे, मोहीम अधिकारी आनंद पाल तसेच एमएलएफ कंपनीचे महाराष्ट्र राज्य प्रबंधक सुरेश कुमार उज्जैनिया व सहायक क्षेत्रीय प्रबंधक (नागपूर) शेखर मुंढे यांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला..ठळक मुद्देरामागुंडम येथील एनएफएल कारखान्याची वार्षिक युरिया उत्पादन क्षमता १२ लाख टनजुलै–सप्टेंबर दरम्यान गडचिरोलीत युरियाची टंचाई वारंवार जाणवत होतीरामागुंडम ते सिरोंचा, अहेरी व गडचिरोली अंतर कमी – थेट ट्रकमार्गे वेळेत पुरवठा शक्यपहिल्या टप्प्यात १०० टन युरिया अहेरी येथेथेट पुरवठ्यामुळे वाहतूक खर्च व विलंब कमी, शेतकऱ्यांना दिलासा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.