Indian Agriculture: दुष्काळ, कोरडवाहू शेती आणि अस्थिर उत्पन्नाच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा ही स्वयंसेवी संस्था गेल्या काही वर्षांत आशेचा किरण ठरली आहे. जलसंधारण, सिंचन विस्तार, शाश्वत शेती, उपजीविका विकास आणि महिला सक्षमीकरण या बहुआयामी कामातून दिलासा संस्थेने ग्रामीण भागात परिवर्तनाची चळवळ उभी केली आहे..यवतमाळ जिल्ह्यात दिलासा या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून व्यापक शेतकरी हिताची चळवळ उभारली गेली आहे. या संस्थेची स्थापना १९९४ मध्ये (कै.) मधुकर धस आणि विजया तुळशीवार-धस यांच्या नेतृत्वात करण्यात आली. संस्थेने घाटंजी येथे पाच एकर जागेवर ‘प्रयोगधाम’ हे प्रशिक्षण केंद्र उभारले. या ठिकाणी आधुनिक शेती, जल व्यवस्थापन व उपजीविका विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. ‘पाटा’ उपक्रमांतर्गत दरवर्षी सुमारे तीन लाख शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे दिले जाते. शेतकऱ्यांना आंतरपीक घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या माध्यमातून जोखीम कमी करण्याचा संस्थेचा उद्देश आहे..जलसंधारणातून सिंचन क्रांतीसंस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती देताना सहायक संचालक कोमल धस म्हणाल्या, की फड, डोह मॉडेल, बोडी फड, शेततळे व मायनर इरिगेशन प्रकल्पांच्या माध्यमातून पाणी वापर संस्थांची उभारणी करून त्यांच्यामध्ये क्षमता विकास करण्यावर भर दिला आहे. याद्वारे ४१,५५२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली. पाच जिल्ह्यांत २५२ फड विकसित करून ११,७१८ एकर कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आली; याचा लाभ ३,९०६ शेतकऱ्यांना होत आहे. गडचिरोलीत १,२२७ बोडी फड उभारून ३,७९२ एकर क्षेत्र सिंचनाखाली आले. यामुळे ९४८ कुटुंबांचे जीवनमान उंचावले. .Indian Agriculture: मूल्यवर्धनाकडून शेतकरी आत्मनिर्भरतेकडे.आठ जिल्ह्यांमध्ये १,९५७ रिचार्ज पीट, २,७६७ डोह संरचना उभारून १५,२१३ एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ झाला. या डोहांची एकूण लांबी ४६१.२ किमी, निव्वळ साठवण ४४२.७५ कोटी लिटर आणि एकूण साठवण क्षमता २,६५६ कोटी लिटर इतकी आहे.सिंचन प्रकल्पांमधील गाळ उपसा करून ६१५ एकर क्षेत्रावर पसरण्यात आला. यामुळे जमीन सुपीक झाली. यवतमाळ, अमरावती व नांदेडमध्ये जिल्ह्यातील एकूण ७० धरणांतील गाळ उपशातून ४४ कोटी लिटर अतिरिक्त जलसाठा उपलब्ध झाला. ही कामे लोक सहभागातून करण्यात आली. ३० गावांत रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब करण्यात आला. नंदुरबार येथे हवामान संवेदनशील शेती आणि एसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने वर्धा, बीडमधील १० गावांमध्ये डिजिटायझेशन प्रकल्प राबविण्यात आला आहे..महिलांसाठी आर्थिक सबलीकरणमहिलांसाठी उभारलेल्या ९५ कस्टम हायरिंग सेंटर्समुळे प्रत्येकी सरासरी १.२५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळू लागले. ९५० शेळीपालन, ६७२ दुग्धव्यवसाय, १५९ कुक्कुटपालन युनिट आणि ४,२८२ सूक्ष्म उद्योगांना पाठबळ देत लाभार्थ्यांना २५ ते ३० हजार रुपये वार्षिक उत्पन्न मिळवून देण्यात यश आले आहे. वनसंवर्धन, सामाजिक बांधिलकीएसबीआय फाउंडेशन जन वन प्रकल्पांतर्गत पांढरकवड्यातील जांगोडाई जंगलात १५ हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण आणि यवतमाळ येथे लोकसहभागातून १० हेक्टर मियावाकी वन (प्रयास वन) विकसित करण्यात आले. या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा उद्देश साधण्यात आला आहे. सात जिल्ह्यांतील ११ स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ७,००० स्वयंसाह्यता समूह आणि ८४,००० महिला जोडल्या गेल्या. त्यांपैकी १,६०० स्वयंसाह्यता समूहांना ४६ कोटी रुपयांचे कर्ज साह्य मिळून ४६,३१६ महिलांना थेट लाभ झाला..मदतीचा हात२०,००० दुष्काळग्रस्त शेतकरी, ५,००० गारपीटग्रस्त आणि ५,००० पूरग्रस्त कुटुंबांना आपत्कालीन मदत देण्यात आली. ६४३ शेतकऱ्यांना ५३ लाख रुपयांचा फिरता निधी देत पीक निविष्ठा व उपजीविका टिकवण्यात आली. तसेच ५० सामुदायिक वनहक्क व्यवस्थापन समित्या स्थापन करून ५० ग्रामसभांसाठी संवर्धन, व्यवस्थापन कृती आराखडे तयार करण्यात आले..परिवर्तनाची चळवळजल, जमीन, जंगल आणि जनशक्ती यांचा समन्वय साधत दिलासा संस्थेने ग्रामीण भागात शाश्वत विकासाचे प्रभावी मॉडेल उभे केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, महिलांना स्वावलंबी करणे आणि पर्यावरण संवर्धन साधणे या त्रिसूत्रीवर आधारित दिलासा संस्थेची ही उपक्रमशीलता आज महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरत आहे..Indian Agriculture: नवे वाण, संकल्प नवा.ग्रामसेवा प्रकल्पाला चालनासंस्थेच्या माध्यमातून एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाची अंमलबजावणी होत आहे. ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या एसबीआय फाउंडेशन ग्रामसेवा प्रकल्पाने गावागावात दीर्घकालीन बदल घडवून आणले आहेत. डिजिटल सुविधा, स्वच्छता, आरोग्य, उपजीविका आणि पर्यावरण संवर्धन या सर्व आघाड्यांवर प्रकल्पाने प्रभावी कामगिरी नोंदवली आहे. या उपक्रमांतर्गत १० ग्रामपंचायतींचे डिजिटायझेशन करून प्रशासन अधिक पारदर्शक व गतिमान करण्यात आले. ग्रामीण युवकांसाठी १० सामुदायिक माहिती केंद्र आणि संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या असून, त्यातून डिजिटल शिक्षणाला चालना मिळत आहे. रस्त्यांवरील सुरक्षिततेसाठी ९० सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी १० आरओ वॉटर फिल्टर युनिट्स कार्यान्वित करण्यात आली असून, त्याचा थेट लाभ गावकऱ्यांना होत आहे. स्वच्छतेच्या दृष्टीनेही मोठे यश मिळवत सर्व १० गावांनी हागणदारीमुक्त दर्जा प्राप्त केला आहे..ग्रामीण कुटुंबांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ४६० लाभार्थ्यांना विविध उपजीविका उपक्रमांतर्गत साह्य देण्यात आले. या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला सरासरी वार्षिक ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. विशेष म्हणजे महिलांनी ‘आरओ’ पाणी व्यवसायातून वार्षिक १ लाख १४ हजार ८६० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून आर्थिक स्वावलंबनाचा नवा आदर्श उभा केला आहे. कोरोना आजाराच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकी जपत दोन कोविड केअर सेंटर्सची स्थापना करण्यात आली. .या केंद्रांमार्फत ३,६९० नागरिकांना मोफत तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी एसबीआय जन वन उपक्रमांतर्गत १० हेक्टर क्षेत्रावर १५ हजार रोपांची लागवड करण्यात आली असून, हरित क्षेत्र वाढीस चालना मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या गरजांसाठी एसबीआय ग्राम सक्षम उपक्रमांतर्गत आठ किसान सेवा केंद्रांची स्थापना करण्यात आली असून, कृषी सेवा अधिक सुलभ झाल्या आहेत. सुविधा, रोजगार आणि पर्यावरण यांचा समतोल साधत एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प ग्रामीण विकासाचे प्रभावी आणि शाश्वत उदाहरण ठरले आहे..ग्रामसक्षम प्रकल्पएसबीआय फाउंडेशनच्या सहकार्याने दिलासा संस्थेच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यामध्ये चोरंबा, दिघी, वडगाव, सायखेडा, पांजरा, बोथली, काकडदरा, भादोड, उमरी, सुकळी अशी दहा गाव आणि मराठवाडा विभागातील बीड जिल्हा अंतर्गत धारूर तालुक्याच्या हिंगणी बु., कचरवाडी, मोठेवाडी, बोडखा, कासारी, निमला, आमला, चिखली, गावंदरा, तांदळवाडी, उंदरी या दहा गावांत शेतकऱ्यांना मशागतीसाठी ट्रॅक्टरची उपलब्धता करून देण्यात आली आहे. त्याकरिता प्रति एकर दोनशे रुपये इतका अल्प दर आकारला जातो..संस्थेचा गौरवनाबार्ड रूरल इनोव्हेशन ॲवॉर्डपाणीदार माणूस पुरस्कारसफाईगिरी पुरस्कारसामाजिक कार्यकर्ता पुरस्कारडॉ. अविनाशी सेवा पुरस्कारकोमल धस ९४२०३०५७१४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.