Census Technology: भारताची जनगणना २०२७ ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होणार असून, ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यात जनगणना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे..प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी केले..Digital Census: डिजिटल जनगणनेसाठी मनपा प्रशासन सज्ज.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात गुरुवारी (ता. २६) जनगणना संचालनालय (मुंबई) व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी (धाराशिव) यांच्या वतीने आयोजित तीनदिवसीय प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ झाला..Census Survey: जनगणनेच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष द्या .यावेळी उपसंचालक किरण गुरव, सहनिरीक्षक पवन गोडे, जिल्हा समन्वयक चेतन प्रकाश, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, तहसीलदार प्रकाश व्हटकर व अंकित सिंह उपस्थित होते. कडवकर म्हणाले की, जनगणनेचे कायदे कडक असून कामात निष्काळजीपणा केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. .तालुका स्तरावर प्रगणकांना सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.उपसंचालक गुरव यांनी सांगितले की, जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ३३ प्रश्नांच्या आधारे माहिती संकलन केले जाईल.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.